उंबरे : वेबटीम आमच्यामुळे गणराज मंडळाचे 9 सदस्य निवडणून आले असे म्हणणाऱ्यानी हिम्मत असेल तर अगोदर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जन...
उंबरे : वेबटीम
आमच्यामुळे गणराज मंडळाचे 9 सदस्य निवडणून आले असे म्हणणाऱ्यानी हिम्मत असेल तर अगोदर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, जनता तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोकणे यांनी दिला आहे.
उंबरे गावात काही लोकांनी पार्ट्या बदलायचा इतिहास आजही सुरू ठेवला आहे. गणराज मंडळाकडून बिनविरोध आलेले तेच लोक आज आमच्यावर गद्दार असल्याचा आरोप करत आहे. स्वतःच्या जीवावर पार्टी निवडून आल्याचे सांगता पण आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुमचे पार्टीसाठी काय योगदान आहे, याचे आत्मपरीक्षण करा. बिनविरोध आल्यानंतर तुम्ही खिशाला झळ सोसली नाही, उलट काही लोकांना मदत करण्याचे कबूल करूनही तुम्ही ऐनवेळी फसवले. त्यामुळे तुमची निष्ठा लोकांनी पहिली आहे. पार्टीसाठी आम्ही लाठ्या काठ्या झेलेल्या, दिवसाची रात्र केली, पण तुम्हाला पद दिले नाही म्हणून लगेच पार्टी सोडायची आणि नेत्यांवर आरोप करायचे, हे उद्योग शोभत नाहीत.तुम्ही इतके लोकप्रिय असाल आणि पार्टी म्हणजे तुम्ही स्वतःला समजत असाल तर एकदा बिनविरोध मिळालेल्या पदाचा राजीनामा द्या आणि जनतेतून निवडून येऊन दाखवा, राजकारणातून सन्यास घेऊ,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत