राजकारणात शिस्तप्रिय माणसांचीच गरज- उपमुख्यमंत्री अजित पवार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजकारणात शिस्तप्रिय माणसांचीच गरज- उपमुख्यमंत्री अजित पवार

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राजकारणामध्ये शिस्तप्रिय माणसांचीच गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ते काल पुणे ये...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राजकारणामध्ये शिस्तप्रिय माणसांचीच गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ते काल पुणे येथे झालेल्या "शिस्तप्रिय भाऊ" या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या जीवन चरित्रावर संपादित केलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते पुण्यातील सर्किट हाऊस मधील शानदार सभागृहांमध्ये हा सोहळा पार पडला अजित पवार म्हणाले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यावर संघाचे संस्कार असल्याने त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून, वागण्यातून शिस्त व्यतीत होत असते, त्यांना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्या कालावधीमध्ये राहुरी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहजपणे सोडवला त्यामुळे त्यांना पाणीदार आमदार या नावाने देखील ओळखतात, त्यांची कार्यकर्त्यांबद्दल असलेली तळमळ तसेच राष्ट्राबद्दल असलेले प्रेम हे वाखानण्याजोगे आहे असे पवार म्हणाले दिंडोरीचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मच्छिंद्र पाटील कदम यांच्या संकल्पनेतून या गौरव ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे व्हिजन इंडिया चे संस्थापक गणेश अंबिलवादे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.



या गौरव ग्रंथांमध्ये चंद्रशेखर कदम यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रकाशित होणे अपेक्षित होते मात्र कोरोना कालावधी मुळे त्याला उशीर झाला असल्याचे संपादक गणेश अंबिलवादे यांनी सांगितले यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम उद्योजक जगदीश कदम, राजेंद्र कदम,सौ,प्रियतमा कदम,सौ,प्रीती कदम,सौ,आदिती कदम, मच्छिंद्र कदम सिद्धार्थ कदम,युगांक कदम, शंतनू अंबिलवादे,पत्रकार अशोक काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी संपादक गणेश अंबिलवादे व अशोक काळे यांनी देवळाली प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने अजित पवार यांचा सत्कार केला मच्छिंद्र कदम यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत