पानेगांव (वार्ताहर)- भगवंताच्या भक्तीमध्येच खरी आपल्याला आशिर्वाद रुपी शक्ती आहे. असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समि...
पानेगांव (वार्ताहर)-
भगवंताच्या भक्तीमध्येच खरी आपल्याला आशिर्वाद रुपी शक्ती आहे. असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी पानेगांव (ता. नेवासे) येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे दिपप्रज्वलन कार्यक्रमात ते बोलतं होते. आपल्या प्रत्येकाच्या संसाररुपी जिवनात देवाची पूजा, प्रार्थना,सेवा त्याच बरोबरचं मनुष्याची, गोमातेची आप आपल्या आई, वडिलांची सेवा तितकीच महत्त्वाची आहे. हे सर्व केल्याने जिवनात कधीच काही कमी पडणार नाही. तालुकाभर फिरत असताना पानेगांवचे नांव नेहमीच निघतं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्याच बरोबर कुठलाही कार्यक्रम घ्या नियोजनबद्ध काम असते युवकांचे विशेष अभिनंदन गडाख यांनी केले. यावेळी गडाख बोलतं असताना यावेळी मंडापामध्ये तुम्ही सर्व ज्ञानेश्वरी पारायण वाचण्यासाठी बसले आहात पुढच्या वर्षी सभामंडपात पारायण सोहळा होईल. असं म्हणताच भाविक भक्तांनी टाळ्यांचा गजरात स्वागत केले.
गोणेगांव संस्थानचे मठाधिपती ह.भ.प जंगले महाराज शास्त्री यांनी तालुक्यात नामदार शंकरराव गडाख पाटील तसेच सभापती सुनिल गडाख यांनी जे काम केले ते अभिनंदननीय आहे. कुठलेही काम सांगा लगेच देवून टाकतात.हि खरी भगवंताची ताकत आहे. मुळाथडी परीसरात कोट्यावधी रुपयांची काम मार्गी लागली.गडाख कुटुंबाचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
जंगले महाराज शास्त्री व पारायण कमिटीच्या वतीने सुनिल गडाख यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संदिप जंगले यांनी सप्ताह पारायण सोहळ्याची किर्तनरुपी सेवेची माहिती तसेच दैनंदिन कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप,
पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, बबनराव जंगले,रंगातात्या जंगले, राजेंद्र जंगले,उपसरपंच रामराजे जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, मुळा बॅंकेचे संचालक रमेश जंगले,संदिप जंगले, किशोर जंगले, भाऊसाहेब काकडे, द्वारकानाथ चिंधे, नानासाहेब जंगले,कै. पोपटराव संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जंगले, रमेश गुडधे, संजय गागरे विठ्ठल गुडधे, दिपक जंगले, साहेबराव जंगले, सतिश जंगले, गणेश जंगले, अच्युतराव जंगले, रामचंद्र सोनवणे, कैलास घुनावंत, डॉ काकडे, हभप गुडधे महाराज, हभप पुराणे महाराज, संभाजी जंगले, भारत जंगले, भिवाजी कापसे,सुर्यभान रोडे, आबासाहेब काकडे, शिवाजी जंगले,सुरज जंगले, रामदास गागरे, बाळासाहेब जंगले, मोहनराव जंगले, बाळासाहेब कल्हापुरे दिनेश जंगले, संकेत जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत