सोसायटी संदर्भात 5 तारखेला आमची भूमिका ठरवू ...! राहुरी : वेबटीम पार्टीसाठी आमचे योगदान व इतिहास तपासणार्यांनी आपला इतिहास अगोदर तप...
सोसायटी संदर्भात 5 तारखेला आमची भूमिका ठरवू ...!
राहुरी : वेबटीम
पार्टीसाठी आमचे योगदान व इतिहास तपासणार्यांनी आपला इतिहास अगोदर तपासावा. ग्रामपंचायत निवडणुकीत किती पैसा खर्च केला? रात्रीच्या अंधारात कोणी विरोधी उमेदवाराच्या भेटीगाठी घेतल्या? तालुक्यातून पार्टी साठी आलेला पार्टी साठीचा फंड कोणी स्वतःच्या खिशात घातला? हे जनतेला वेगळे सांगायची गरज नाही, ते सर्वांना ठाऊकच आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्या प्रा. सारिका ढोकणे यांनी केला आहे.
आम्ही काल ही स्वतंत्र होतो, आज ही आहोत, आणि उद्या देखील स्वतंत्रच असणार आहोत. म्हणून निवडून येऊन देखील आम्ही आजही स्वतंत्र विचाराचेच आहोत. आम्ही पार्टी बदलली या विचारात काही सामाजिक कार्यकर्ते आनंदात असतील, लोकांना आता आमच्याशिवाय पर्याय नाही असे वाटत असेल तर हा आनंद फक्त येत्या 5 तारखेपर्यंतच टिकेल. लोकांमध्ये आगीतून निघून फुफाट्यात पडल्याची भावना आहे.पण आम्ही तसे होऊ देणार नाही. लोकांच्या भावनेला नक्कीच न्याय देऊ. अर्ज काढण्याच्या दिवशी आमची भूमिका स्पष्ट करू.
सूर्याला त्याच्या अस्तित्वाची वेगळी ओळख करून द्यावी लागत नाही, आजूबाजूचा प्रकाश हीच त्यांची ओळख असते. त्यामुळे आमच्या प्रसिद्धी विषयी शंका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला इतिहास तपासावा. आपल्याच पार्टीकडून उभे करायचे, निवडुन येण्यासाठी परिस्थिती फार वाईट आहे असे सांगून त्याच्या कडून पैसे उकळायचे व विरोधी उमेदवाराकडे जाऊन त्याला पण सांगायचे की तुला निवडून आणतो काही पैसे दे, तो पण पैसे देतो. आणि अशाप्रकारे आपल्याच पार्टीतील काही उमेदवार पडायचे व फक्त स्वतःच्या गटातील 4-5 उमेदवार निवडून आणायचे. तसेच नेता निवडीवेळेस हे 5 जण माझे आहे असे म्हणून सर्वांचा विचार न करता पुन्हा एकदा घोडेबाजार करायचा हे जनेतेला चांगलेच माहिती आहे. घोडमैदान दूर नाही, त्यामुळे कोणाची प्रसिद्धी किती व कोणाची कुप्रसिद्धी किती हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत