कोल्हार कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये नौकरी साठी निवड. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हार कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये नौकरी साठी निवड.

सात्रळ/वेबटीम:- आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज कोल्हार येथे प्लेसमेंट विभाग यांच्या  वतीने नाशिक येथील गलोब स्पेसिलीटीज  प्रा. लि.नाशिक  या ...

सात्रळ/वेबटीम:-


आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज कोल्हार येथे प्लेसमेंट विभाग यांच्या  वतीने नाशिक येथील गलोब स्पेसिलीटीज  प्रा. लि.नाशिक  या नामांकित कंपनीच्या मुलाखतींचे आयोजन   महाविद्यालयात करण्यात आले होते .  या प्रसंगी प्रवरेचे माजी विद्यार्थी व कंपनी चे  जनरल मॅनेजर डॉ.नवनाथ शिंदे  प्रमुख   पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी मुलांना मोठी स्वप्ने पहावी पण ती पूर्ण करण्याची  जिद्द ठेवावी. तसेच यशस्वी जीवनाचा आनंद, दररोज काहितरी नविन शिकण्याची इच्छा यां विषयी  देखील मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी  कंपनी ची संपुर्ण महिती. कंपनी चे व्हिजन ,ध्येय धोरण  विषद केले .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपानराव शिंगोटे यांनी या कॅम्पस इंटरव्ह्यू मागची संकल्पना , इंटरव्ह्यू विशेषतः आर्टस विभाग साठी  आयोजीत करण्याची का गरज भासली.पद्म्भुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यानी प्रवरा परिसरातील सर्वसामान्य कुटूबातील विद्यार्थाने विद्यापीठ पदवी घेऊन स्वताच्या पायावर ताठ उभे राहीले पाहिजे.विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहे,त्यातून आपण पुढे गेलो पाहिजे.  जागतिक स्पर्धेत जगायचे असेल तर   कस्ठाशिवाय पर्याय नाही. तसेच  महाविद्यालयाची जडण घडण  या विषयी  प्राचार्य यानी मौलिक मार्गदर्शन केले .  यापसंगी कंपनीचे  डॉ. गोवर्धन  परांडे सर रिसर्च अँड डेवहलपमेंट  प्रमुख,  अनिकेत तांबे  मॅनेजर  कॉलिटी कंट्रोल  उपस्थित होते.  या ठिकाणीया ठिकाणी झालेल्या मुलाखती  साठी   ३५विदयार्थी  सहभागी झाले होते.



याप्रसंगी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ जयश्री    सिनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपानराव शिंगोटे,  प्लेसमेंट विभाग प्रमुख सचिन वडीतके, शरद दिघे,उत्तमराव येवले,सागर घोलप,  रसायन शास्त्रविभगप्रमुख विनोद कडु, श्रद्धा तांबे,  ऋषिकेश घोगरे,   यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत