देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी येथे निसर्गाचा चमत्कार घडला आहे गायीने चक्क दोन कालवडींना जन्म दिल...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी येथे निसर्गाचा चमत्कार घडला आहे गायीने चक्क दोन कालवडींना जन्म दिला आह. निसर्ग निर्मितीचा जो नियम आहे, किंवा जे घडत असते त्या पेक्षा वेगळ्या घटना घडण्याचे प्रकार अलीकडे जनावरांच्या बाबतीत घडत आहेत.
पाळीव जनावरे, गाय, म्हैस यांना सहसा एकच वासरू जन्माला येते. परंतु देवळाली प्रवरातील शेटेवाडी येथील शेतकरी शिवाजी अशोक मोरे यांच्या गायीने चक्क दोन कालवंडांना परवा शेतातील गोठ्यात जन्म दिला आहे. गायीच्या दोन्ही कालवड आणि गाय सुखरूप आहेत.
गायीने आजपर्यंत केवळ एकाच वासराला जन्म दिला आहे, परंतु यावेळी मात्र दोन वासरांना जन्माला देऊन चमत्कार घडविला आहे. हे दोन्ही कालवड आणि गाय पाहण्यासाठी शेटेवाडी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत