आंबी(वेबटीम) महाराष्ट्र विश्वकर्मा कारागीर युनियनचे शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांचा वाढदिवस शंबूक विद्यार्थी वस्तीगृहातील मुलांना शालेय साहि...
आंबी(वेबटीम)
महाराष्ट्र विश्वकर्मा कारागीर युनियनचे शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांचा वाढदिवस शंबूक विद्यार्थी वस्तीगृहातील मुलांना शालेय साहित्य व मिष्टान्न वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. वसतिगृहाचे अधीक्षक श्री. दिवे यांनी शंबूक वस्तीगृहाची गेली २९ वर्षापासून असलेली वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडली. अवाजवी खर्च टाळून महाराष्ट्र विश्वकर्मा सेना कारागीर युनियनचे जिल्हाध्यक्ष मनोज जाधव यांनी निलेश सोनवणे यांचा वाढदिवस वसतिगृहातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा केल्याबद्दल कौतुक केले.
जिल्हाध्यक्ष मनोज जाधव यांनी वर्षभरापासून महाराष्ट्र विश्वकर्मा सेना समाज हितासाठी कार्य करत आहे. या काळात १२५ कुटुंबांना किराणा किट वाटप, कोरणा ग्रस्त कारागीर बांधवांना वैद्यकीय व आर्थिक मदत, विश्वकर्मा मंदिरात परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण आदी उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी शहर संघटक निलेश जाधव यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र एन. सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष विलास भालेराव, शहर उपाध्यक्ष संदीप भामरे, उमेश शिरसाठ, ललित बाविस्कर, शहर संघटक निलेश जाधव, जीवन सूर्यवंशी, संदीप वाघ, राजेंद्र कापडे, चेतन शिरसाठ, रोहित राजेंद्र सूर्यवंशी, संतोष वाघ आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत