देवळालीतील ' या' नेत्याचा भाजपाशी अलिप्तवाद! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळालीतील ' या' नेत्याचा भाजपाशी अलिप्तवाद!

  देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:-       देवळाली प्रवरा नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकंतील ढुस व संसारे यांना राम- लक्ष्मणाची उपाधी मिळाली. ...

 देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:-


     देवळाली प्रवरा नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकंतील ढुस व संसारे यांना राम- लक्ष्मणाची उपाधी मिळाली. पैकी राम अर्थात सचिन ढुस हे भाजपाचे गटनेते होते. नुकतेच सचिन ढुस यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसाचे फ्लेक्स हि झळाकले. परंतू या  फ्लेक्सवर माञ भाजपाचे स्थानिक नेते माजी आ. चंद्रशेखर कदम अथवा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे फोटो माञ जाणीवपुर्वक टाळले गेले की काय अशी चर्चा देवळाली प्रवरात  सुरू आहे.  ढुस यांचे दोन्ही थड्यावर हात असल्याने ना.तनपुरे यांच्याशी असलेले संबध तटू नये म्हणून रामाने(सचिन ढुस)भाजपा नेत्यांचे फोटो टाळले असावे असा अंदाज राजकीय गोटातून काढला जात आहे.

  देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीत राष्ट्रावादीला सोडचिठ्ठी देवून सचिन ढुस भाजपात दाखल झाले. त्यापुर्वी राष्ट्रवादी सह अपक्ष म्हणून अनेक वेळा निवडणूक लढविली पण विजय माञ मिळाला नाही. नगरपालिकेत नगरसेवक होण्याचे स्वप्न अपुरे राहीले होते.2015 मध्ये राष्ट्रवादीला रामराम ठोकुन ढुस भाजपात दाखल होत निवडणूक लढविली. त्यात चांगल्या मताने विजय झाला. लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यावर जादुची कांडी फिरवून ढुस यांनी गटनेता पदाची माळ गळ्यात घालून घेतली.

भाजपाचे गटनेते ढुस हे नगर पालिकेतील पंचवार्षिक मुदत संपल्या पासुन भाजपापासुन अलिप्तवादी राहत असल्याचे दिसून आले.

भाजपाचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या सौभाग्यवती प्रिती कदम यांनी महिला दिना निमित्त 'खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने भाजपाच्या नगरसेवकांत चांगलीच चर्चा सुरु होती.

ढुस यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे वृत्त 'आवाज जनतेचा' वेबटीमने प्रसिद्ध करताच खुद्द माजी आ.कदम यांनी भ्रमणभाषवर ढुस यांना संपर्क साधुन अलिप्तवादी राहत असल्याबाबत विचारणा केली असल्याचे समजते.त्यामुळे नाईलाजाने ४ राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर विजयउत्सव साजरा करण्यासाठी आले.परंतू या कार्यक्रमात जास्तवेळ न थांबता काढता पाय घेतला.  पुन्हा आता ढुस यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संपर्क तोडला असल्याचे खुद्द भाजपाचे कार्यकर्ते व नगरसेवक सांगत आहेत.

              देवळाली पालिकेची आगामी निवडणूक लवकरच होण्याची अपेक्षा आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ढुस दोन्ही थड्यावर हात देवून आहे.नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा शहरात लावलेल्या फ्लेक्सवर भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे तर नाहीच परंतू स्थानिक नेत्यापैकी  माजी आ.चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष कदम यांच्यापैकी एकाचाही फोटो फ्लेक्सवर लावण्यात आला नाही. यामागे दोन थड्यावरील राजकारणाचे हात असल्याची चर्चा आहे. फ्लेक्सवर भाजपाच्या नेत्यांचे फोटो वापरुन राष्ट्रावादीचे नेते ना. तनपुरे यांचा रोष नको म्हणून फोटो वापरले नाहीत अशी चर्चा भाजपाच्या गोटातून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत