राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी परिसरातून एक १३ वर्षीय व एक १५ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी परिसरातून एक १३ वर्षीय व एक १५ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना तालूक्यात घडल्या आहेत. या बाबत शुक्रवार 25 मार्च रोजी राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत राहुरी फॅक्टरी परिसरातील एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहत आहे. दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ती मुलगी मोबाईलला बॅटरी टाकून येते. असे सांगून घरातून बाहेर गेली होती. मात्र ती उशिरापर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू ती मिळून आली नाही. त्या मुलीच्या आईने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक सुनिल निकम हे करीत आहेत.
दुसर्या घटनेत एक १५ वर्षीय मुलगी तिच्या कुटूंबासह राहुरी फॅक्टरी परिसरात राहते. दिनांक २३ मार्च रोजी नेहमी प्रमाणे घरातील काम आवरल्या नंतर घरातील सर्वजण झोपी गेले. रात्री नऊ ते पहाटे तीन वाजे दरम्यान ती १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गर्जे हे करीत आहेत.
राहुरी फॅक्टरी येथून दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेल्याने या परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत