कोपरगाव / प्रतिनिधी कोपरगाव शहरातील जुना प्रभाग क्रमांक ५ आत्ताचा नवीन ६ मधील स्वतःला जनतेचे सेवक म्हणून मिरवणाऱ्या नगरसेवकांनी सत्तेचा गैरव...
कोपरगाव / प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील जुना प्रभाग क्रमांक ५ आत्ताचा नवीन ६ मधील स्वतःला जनतेचे सेवक म्हणून मिरवणाऱ्या नगरसेवकांनी सत्तेचा गैरवापर करुन चक्क नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरातील मतदार यादीत म्हणजेच नवीन प्रभाग क्रमांक ६ मध्ये आलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने तातडीने चौकशी करुन समाविष्ट सर्व नावे वगळावी. यावरून नक्कीच सत्तेचा गैरवापर करणाऱ्या नगरसेवकांचा आगामी निवडणुकीत पराभव निश्चित होईल, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
तत्पूर्वी, वरील गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याबाबत गायकवाड यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे. निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार अनेक प्रकारच्या उपाययोजना करतात. परंतु जुना प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवकांनी चक्क ग्रामीण भागातील मतदारांची नावे तसेच रहिवासी एका प्रभागात त्याच्या मतदानासाठी दुसऱ्या प्रभागात नावे अशी परिस्थिती जुना प्रभाग क्रमांक ५ म्हणजे नवा प्रभाग क्रमांक ६ मधील आहेत. प्रभागात अनेक नावे असल्याने याच प्रभागातील यादी भाग क्रमांक १२२ मधील मतदारांची चौकशी केली असता यात तब्बल १४९ मतदार ग्रामीण भागातील व इतर प्रभागात रहिवासी असल्याचे निदर्शनास आले आहेत.
एका भाग यादीत १४९ मतदार असे आहेत तर संपूर्ण प्रभागात किती असेल? या मतदारांचा देखील लवकरच शोध घेतला जाणार असून प्रभागातील वस्तुस्थिती लवकरच जनतेपुढे येईल. परंतु ज्यांनी अशा मतदारांचा वापर फक्त सत्तेसाठी करुन जनतेची दिशाभूल केली अशांचा येणाऱ्या निवडणुकीत पराभव निश्चितच आहेत. प्रशासनाने देखील कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती चौकशी करावी व ज्यांची नावे ग्रामीण भागात आणि शहरात पण आहे. एकाचवेळी दुहेरी फायदा घेणाऱ्या मतदारांची नावे देखील तातडीने कमी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत