राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छत्रालयाचे विद्यार्थी महेश बडाख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छत्रालयाचे विद्यार्थी महेश बडाख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम तर केंद्रात 23 वा क्रमांक पटकावल्याबद्दल देवळाली प्रवरा येथे तरुण वर्ग व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
महेश बडाख यांनी मंगळवारी देवळाली प्रवरा शहरात सदिच्छा भेट दिली असता देवळाली प्रवरा बाजारतळ येथे तरुण वर्ग व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात येऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अजय खिलारी, युवक काँग्रेसचे राजेंद्र बोरूडे, बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब आढाव सतीश म्हस्के, अविनाश जाधव , विलास संसारे, योगेश भालेकर,बळवंत गडाख भगवान गडाख, राहुल महांकाळ, नितीन वाळके, गोविंद राजळे, अनिल भालेकर, संभाजी वाळुंज, कार्तिक मुसमाडे, संदीप महाडिक, दीपक पाडळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत