राहुरी(प्रतिनिधी) बुऱ्हानगर इतर गावे पाणी योजना तसेच मिरी तिसगाव पाणी योजना विजेच्या थकबाकीच्या कारणाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला...
राहुरी(प्रतिनिधी)
बुऱ्हानगर इतर गावे पाणी योजना तसेच मिरी तिसगाव पाणी योजना विजेच्या थकबाकीच्या कारणाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला होता त्यामुळे पाणी योजनेखालील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नव्हता सदरील बाब ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी खंडित केलेला विद्युतपुरवठा तातडीने सुरू करण्याचे आदेश महावितरण कंपनीला दिले त्यामुळे पिण्याच्या पाणी योजना तील गावांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आज मंत्री तनपुरे यांनी लगेचच कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.
संबंधित योजनांचा पाणीपुरवठा मुळा धरणाच्या पाण्यातून केला जातो धरणाच्या परिसरात असलेल्या विद्युत पुरवठा भागातच विद्युत पुरवठा खंडित केलेला होता मिरी तिसगाव पाणी योजना दि 18 मार्च रोजी बंद पडली होती तर बुर्हानगर व इतर गावाची पाणीयोजना सोमवारी बंद पडली ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे सध्या अधिवेशनामध्ये व्यस्त असतानाही त्यांनी याप्रश्नी अधिकचे लक्ष घालत तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे फर्मान सोडले असल्याने आज बुधवारी विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.
ऐन उन्हाळ्यात पाणी योजनेची गरज असताना पाणी मिळत नव्हते अखेर मंत्री तनपुरे यांनी मार्ग काढत योजना सुरळीत चालू राहण्यासाठी प्रयत्न केले तिसगाव पाणी योजनेअंतर्गत 30 गावे तर बुर्हानगर व इतर गाव पाणी योजनेअंतर्गत 44 गावे समाविष्ट आहेत तिसगाव योजनेचे 3 कोटी 41 लाख रुपयांची वीज थकबाकी आहे तर बुर्हानगर व इतर गावपाणी योजनेची थकबाकी सुमारे 12 कोटी रुपयांच्या आसपास आहे विद्युत पुरवठा जोडल्याने योजनेतील लाभार्थ्यांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत