राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र तथा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मार्शल संसारे यांची पुणे वाघोली येथील मिकासा सहकारी गृहनिर्माण सं...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र तथा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मार्शल संसारे यांची पुणे वाघोली येथील मिकासा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच निवड झाली आहे.
पुणे येथील वाघोली परिसरात मिकासा विकास सहकारी गृहनिर्माण संस्था असून या संस्थे अंतर्गत जवळपास ५०० फ्लॅट असून २ हजार नागरिक वास्त्व्यास आहेत. मुबलक क्षेत्र व सर्व सुविधांनीयुक्त मिकासा सोसायटीच्या चेअरमनपदाची निवड मंगळवारी पार पडली.
यावेळी देवळाली प्रवराचे सुपुत्र, उद्योजक व माजी नगराध्यक्ष प्रकाश संसार यांची सर्वानुमते चेअरमनपदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल प्रकाश संसारे यांचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, पुणे येथील उद्योजक जगदीश कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच देवळाली प्रवरा शहरवासियांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत