अहमदनगर(वेबटीम) राज्यातील ८४६ उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. असून आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढल...
अहमदनगर(वेबटीम)
राज्यातील ८४६ उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. असून आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले आहेत. नगर जिल्हा पोलीस दलातील १४ पोलीस उपनिरीक्षकांची सहायक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे.उपनिरीक्षक पदावरून सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
यामध्ये राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बाबुराव उर्फ विक्रम मिसाळ यांची पुणे शहर, पंकज शिंदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नितीन खैरनार यांची ठाणे ग्रामीण, नितीन पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.कृष्णा धायवाट यांची नांदेड परिक्षेत्र, विनोद जाधोर यांची विशेष सुरक्षा विभाग, सध्या भिंगार कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक व राहुरीत यापूर्वी काम केलेले सतीश शिरसाठ यांची मुंबई लोहमार्ग, राजेश घोलवे यांची मुंबई शहर, प्रकाश बोराडे यांची मुंबई शहर, संगीता गिरी यांची मुंबई शहर,
धीरज राऊत यांची मुंबई शहर, भरत नागरे यांची मुंबई शहर, धनराज जारवाल यांची लोहमार्ग मुंबई येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत