राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील शरद म्हसे यांची नुकतीच ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील शरद म्हसे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष दत्ता मारोती खराटे यांनी यासंदर्भात नुकतेच नियुक्ती पत्र म्हसे यांना दिले आहे. जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर म्हसे यांनी सांगितले, संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या तळागळातील विद्यार्थी व फार्मासिस्ट पर्यंत पोहचण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांचे व फार्मासिस्ट यांचे प्रश्न सोडवण्याठी व संघटनेचे विविध उपक्रम राबविण्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत