राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- ब्राह्मणगाव भांड येथील साईअमृत डेड डेअरीमुळे शेतकऱ्यांना सोनेरी दिवस आले साईअमृत डेअरीचे चेअरमन सचिन काळे यांनी ११ म...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
ब्राह्मणगाव भांड येथील साईअमृत डेड डेअरीमुळे शेतकऱ्यांना सोनेरी दिवस आले साईअमृत डेअरीचे चेअरमन सचिन काळे यांनी ११ मार्च पासून बिगर उचल धारक दूध उत्पादक सभासदांना फॅट ३.५ व एस.एन.एक ८.५ साठी ३५ रुपये भाव जाहीरकेला आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे या हेतूने दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी साई अमृत डेअरी नेहमी अग्रेसर असून ११ मार्च पासून फॅट ३.५ व एस.एन.एक ८.५ साठी ३५ रुपये भाव जाहीर केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी साई अमृत डेअरिस दूध द्यावे, त्या तुलनेत शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देऊ असे सचिन काळे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत