काकडी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काकडी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटी

कोपरगाव प्रतिनिधी :-   काकडी विमानतळाच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात काकडी विमान तळासाठी १५० कोटीची तरतूद के...

कोपरगाव प्रतिनिधी :- 


काकडी विमानतळाच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात काकडी विमान तळासाठी १५० कोटीची तरतूद केली आहे. हा जगभरातून येणाऱ्या साईभक्तांसाठी आघाडी सरकारचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे  यांनी म्हटले आहे.



दुष्काळी गावे अशी ओळख असणाऱ्या कोपरगाव-राहाता तालुक्याच्या सीमेवरील काकडी व परिसरातील गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे विमानतळ आणले. विमानतळ झाल्यामुळे जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे दर्शनासाठी येण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर होऊन परिसराचा विकास होण्यास मोठी मदत झाली. मात्र मागील काही वर्षापासून काकडी विमानतळ समस्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे जगभरातून येणाऱ्या साईभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काकडी विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ हि सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा बंद झाली होती. त्यामुळे साई भक्तांची गैरसोय होवून विमानाने येणाऱ्या साईभक्तांवर अवलंबून असणाऱ्या टॅक्सी चालकांचे देखील नुकसान होत होते. त्याबाबत विमान प्राधिकरण अधिकारी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दालनात ना. आशुतोष काळे यांनी बैठका घेतल्या घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे काकडी विमानतळाच्या सोयी सुविधांसाठी निधी मिळावा याबाबत मागणी केली होती.


त्या मागणीची अर्थमंत्र्यांनी दखल घेवून नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात काकडी विमान तळाच्या सर्वांगिण विकासासाठी १५० कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेले काकडी विमानतळ समस्येतून बाहेर येण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात आली आहे. शिर्डीत भविष्यात परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने या निर्णयाचे महत्व खूप मोठे असून १५० कोटी रुपये निधी काकडी विमान तळाच्या विकासाच्या दृष्टीने परिसराचा देखील विकास होणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत