कोपरगाव/प्रतिनिधी = लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून कोपरगाव शहर आणि तालुक्यात नेहमीच छोटे-मोठे सामाजिक कार्य करत असते...
कोपरगाव/प्रतिनिधी =
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून कोपरगाव शहर आणि तालुक्यात नेहमीच छोटे-मोठे सामाजिक कार्य करत असते. येत्या 15 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुलांच्या बुद्धीमत्तेबरोबर भौतिक सुविधांची गरज असते हीच गरज ओळखून लायन्स क्लब व यश कोचिंग क्लासेस यांच्यावतीने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथील दहावीच्या 300 विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व मेडिकल किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष राम थोरे, सचिव अक्षय गिरमे, खजिनदार सुमित भट्टड, ज्येष्ठ सभासद विजय नानकर, यश कोचिंग क्लासेसचे संचालक इनामदार सर, सुतावणे सर, मुख्याध्यापक मकरंद कोर्हाळकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी, उपमुख्याध्यापक आर. बी. गायकवाड, कुळधरण सर, शिरसाळे सर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मकरंद कोर्हाळकर यांनी केले. यावेळी लायन्स क्लबच्या सर्व सभासदांनी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश गोरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत