राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची आज शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे शांती चौक मित्र मंडळ व...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची आज शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे शांती चौक मित्र मंडळ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
नामदार रामदास आठवले हे शिर्डी कडून नगर कडे जात असताना राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे विविध सामाजिक संघटना, आरपीआय व शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,युवा उद्योजक ऋषभ लोढा,दत्तात्रय दरंदले, दत्ता साळुंके, प्रकाश सोनी, अतुल त्रिभुवन, महेश भनगडे, गायकवाड सर, साई त्रिभवून, प्रवीण पाळंदे, नितीन डंबाळे,पत्रकार आशिष संसारे,जेम्स पाळंदे,सुनील संचेती, सुभाष वाघ आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत