राहुरी ः वेबटीम जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या आणि आगामी उंबरे झेडपी गटातील निवडणुकीसाठी रंगीत तालीम समजल्या जाणार्या उंब...
राहुरी ः वेबटीम
जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या आणि आगामी उंबरे झेडपी गटातील निवडणुकीसाठी रंगीत तालीम समजल्या जाणार्या उंबरे सोसायटीची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगात येत आहे. काही उमेदवारानी भेटीगाठी आणि चहापाणी सुरू केल्याने उंबरे स्टँड गजबजून गेले आहे.
सोमवारी सत्ताधारी आणि विरोधी गटातील मात्तबर इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खर्याअर्थाने राजकारण तापले आहे. त्यात, काल पुन्हा पाच अर्ज दाखल झाल्याने एकूण इच्छुकांचा आकडा हा आता 24 वर पोहचला आहे. अर्ज भरण्यासाठी अजून दोन दिवस बाकी असल्याने सोसायटीच्या 13 जागांसाठी 50 पेक्षा अधिक अर्ज येतील, असा अंदाज आहे. काल संदीप केशवराव ढोकणे यांचे दोन अर्ज आले. यातील एक ओबीसी आणि दुसरा सर्वसाधारण आहे. शशिकांत रामराव ढोकणे यांचा सर्वसाधारण मधून अर्ज आलेला आहे. रघुनाथ रंगनाथ ढोकणे यांचा सर्वसाधारण मधून अर्ज भरला आहे. बाबासाहेब हरिभाऊ सासवडे यांचाही सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल झालेला आहे. यापूर्वी ओबीसीतून विलास रघुनाथ ढोकणे यांचा अर्ज दाखल झालेला असून, काल संदीप ढोकणे यांचा ओबीसीतून दुसरा अर्ज आला आहे.
17 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 22 मार्च ते 5 एप्रिल अर्ज माघारीची मुदत आहे. तर 15 एप्रिल रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी निकाल घोषीत होणार आहे. निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांना राजेंद्र दुशिंग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत