कोपरगाव/वेबटीम:- शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे उर्फ अण्णा यांच्या ८४ व्या जयंती निमित्त रेन्बो इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन...
कोपरगाव/वेबटीम:-
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे उर्फ अण्णा यांच्या ८४ व्या जयंती निमित्त रेन्बो इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले.
ह्याच दिनाचे औचित्य साधत शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून त्यांच्याच विचारधारेनुरूप स्थापन झालेल्या रेन्बो इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासुन अहमदनगर जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी *'शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा'* सुरु करून या परीक्षेत प्रत्येक वर्गातून अनुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना *शैक्षणिक वर्ष २०२२ - २०२३ पासुन* रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता १० वी पर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे .
ही परीक्षा *रविवार दि.१३ मार्च २०२२* रोजी *सकाळी १०.०० वाजता* रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार आहे तरी *अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सेमी इंग्रजी माध्यम, सर्व इंग्रजी माध्यम व सी.बी.एस.ई* माध्यमांतील विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी व 'शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे शिष्यवृत्ती' परीक्षेतंर्गत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक श्री.आकाशजी नागरे यांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत