राहुरीत भाजपला धक्का - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत भाजपला धक्का

  मुंबई/वेबटीम:- माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी ३.०...

 मुंबई/वेबटीम:-





माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी ३.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान माजी आ.शिवाजीराव कर्डीले हे देखील येत्या आठ ते दहा दिवसात राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे विश्वासनिय सुञाकडून समजते आहे.





         गेल्या अनेक महिन्यापासून भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे हे राष्ट्रवादीत जाणार अशी वारंवार चर्चा होत असताना आज अचानक अमोल भनगडे आपल्या विश्वासु समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत. आज दुपारी ३.०० वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.


मंजाबापू कोबरणे,पोपट कोबरणे,गंगाधर कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे, अंजाबापू कोबरणे यांनी भनगडे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी संतोष आघाव, भारत भुजाडी,सुयोग नालकरअनिल घाडगे, किरण कोळसे आदी उपस्थित होते.

   अमोल भनगडे हे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार असून जिल्हा परीषदेत यापुर्वी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने व राजकीय गणित बांधुन भनगडेसह विश्वासु समर्थकांनी राष्ट्रावादीत प्रवेश करुन आगामी जिल्हा परीषदसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे आश्वासन मिळाले आहे. 



दरम्यान माजी.आ.कर्डीले राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा असून ते येत्या ८ किंवा १० मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.त्यांच्या बरोबर  राहुरीतील काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते.  


राहुरीतील राजकारणाची दिशा बदलून राहुरी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परीषदेचे निवडणूकीत राष्ट्रावादीच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार व भाजपाला परखड नेता निर्माण करावा लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत