कोल्हार येथे 'ब्रह्माकुमारीज् विद्यालयात महाशिवरात्री निमित्त विश्व शांतीसाठी योगदान' - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हार येथे 'ब्रह्माकुमारीज् विद्यालयात महाशिवरात्री निमित्त विश्व शांतीसाठी योगदान'

सात्रळ(वेबटीम):- परमपिता परमात्मा 'शिव' यांचे दिव्य अवतरणाचे प्रतिक महाशिवरात्री हे पावन पर्व कोल्हार येथील ब्रह्माकुमारी विद्यालयात...

सात्रळ(वेबटीम):-




परमपिता परमात्मा 'शिव' यांचे दिव्य अवतरणाचे प्रतिक महाशिवरात्री हे पावन पर्व कोल्हार येथील ब्रह्माकुमारी विद्यालयात उत्साहाने साजरे करण्यात आले. 



या पावन प्रसंगी परमात्मा शिव पित्याचे ध्वजारोहण करण्यात आले, तसेच सम्पूर्ण विश्वाला मेडिटेशन द्वारे शांतीचे प्रकंपन देऊन विश्व शांती स्थापन करण्याच्या ईश्वरीय कार्यात सर्व उपस्थित मान्यवरांनी आपला खारीचा वाटा घेतला. वर्तमान तणावाचे वातावरण परिवर्तन करून शक्तिशाली वातावरण तयार व्हावे यासाठी सर्व उपस्थित आत्मिक बंधु-भागिनींनी दररोज 10 मिनिट मेडिटेशन करण्याचा संकल्प केला. 


सदर प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना व उद्देश ब्रह्माकुमारी पद्मा दीदींनी सांगितला. ब्रह्माकुमार शिवाजी भाईजी यांनी परमात्म अवतरणाचा संदेश देऊन ईश्वरीय कार्या विषयी माहिती दिली. व वर्तमान समयाचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. व मा. संपतराव खर्डे पा. व प्रसिद्ध व्यापारी पुरुषोत्तम हिरानंदानी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


 कोल्हार सेवाकेन्द्रा च्या संचालिका स्वाती दीदींनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी, भगवती माता देवस्थान ट्रस्ट चे ट्रस्टी बापूसाहेब देवकर , कृषि अधिकारी वेणुनाथ खर्डे पा. विजयाताई खर्डे, उक्कलगाव चे शरद थोरात पा. आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ईश्वरीय प्रसाद स्वीकार करून झाली. बी के दत्तात्रय भाई कसबे, गणेश भाई सोमवंशी, मधुकर भाई राउत, नामदेव भाई वाडेकर व विलासभाई डहारे यांनी ईश्वरीय संदेश असलेले कार्ड व पर्चे कोल्हाळेश्वर मंदिर व कोल्हार परिसरात घरोघर देऊन ईश्वरीय संदेश दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत