देवळाली प्रवरा(वेबटीम):- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांकडे आमदार दुर्लक्ष करतात असा मतदारांचा गैरसमज निर्माण ...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांकडे आमदार दुर्लक्ष करतात असा मतदारांचा गैरसमज निर्माण झाला होता.परंतू 32 गावात मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भुमिपुजन केले असून मतदारांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यास तडा न जात विकास कामे चालूच राहतील.श्रीरामपूर मतदारसंघात २०० कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याचे प्रतिपादन आ.लहू कानडे यांनी केले.
देवळाली प्रवरा शहरातील आंबी स्टोअर ते चव्हाण वस्ती खडीकरण,आंबी रस्ता ते चव्हाण वस्ती हनुमान मंदिर रस्ता खडीकरण,गुहा,देवळाली,टाकळीमियाँ,तिळापूर,ते शिपलापूर रस्ता दुरुस्तीसह इतर कामांचा शुभारंभ आ.कानडे यांच्या हस्ते पार पडला.प्रसंगी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते. प्रारंभी अध्यक्षपदाची सूचना कोंग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी यांनी मांडली तर प्रास्तविक देवळाली शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे यांनी केले.
माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांचे नाव न घेता टिका करताना आ.कानडे म्हणाले म्हणाले की, आज जे विकास कामाचे भुमिपुजन चालू आहे.ती कामे मीच मंजुर केली होती.असे काही मंडळी सांगत आहे. मी कोरोनाने आजारी पडलो होतो.त्यावेळी विरोधक हळद लावून तयार होते.
कोरोना काळात खाजगी दवाखान्यात लुट होत असताना श्रीरामपुर व देवळाली प्रवरात मोफत शासकीय कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्ण बरे केले. मात्र देवळाली प्रवराच्या सत्ताधाऱ्यांनी सेवेच्या नावाखाली कोविड उपचार सेंटर उघडून मेवा कमविण्याचे उद्योग केल्याची टीका त्यांनी केली. मतदारसंघात 200 कोटी पेक्षा जास्त रुपयांची विकास कामे मार्गी लावले आहे.हि सर्व कामे महसुलमंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले की,अलीकडेचे सहा महिन्यात 32 गावात विकास करण्याचं धडाकेबाज काम आ.कानडे यांच्यामार्फत सुरू आहे. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्ते व इतर कामासाठी 1 कोटी तर गुहा-तिळापूर रस्तासाठी 1 कोटी निधी आ.कानडे यांनी दिल्याबाबद्दल त्यांचे आभार मानून देवळाली वळाली प्रवरा गावाने तुमच्यावर प्रेम केले व मोठा लीड दिला. पुढील निवडणुकीत ही जनता तुमच्या बरोबर असून वेळी जास्तीत जास्त लीड देऊ असे ते म्हणाले. काँग्रेसने काय केलं हे भाजपवाले ओरडत असतात. देवळाली प्रवरा पासून दिल्लीपर्यंत खोट बोलुन काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजप वाल्यांचा धंदा असल्याचे चव्हाण म्हणाले.
यावेळी माजी सभापती इंद्रभान थोरात, अंकुश कानडे, जिल्हा सचिव अजय खिलारी, अशोक कानडे, अमृत धुमाळ, मुजफ्फर पठाण, नानासाहेब कदम, विश्वास पाटील, दीपक पठारे, भगवान गडाख, बाळासाहेब सगळगिळे, गोरख चव्हाण, राजेंद्र चव्हाण, डॉ.आप्पासाहेब चव्हाण, मेजर शरद चव्हाण, सोमनाथ खांदे, ललित चोरडिया, कारभारी वाळुंज,काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील, शुभम पाटील, मयूर अडागळे ,भाऊ गुंजाळ, राजेंद्र लोखंडे, बाळासाहेब आढाव,जयेश माळी, कुमार भिंगारे,सुखदेव होले, दीपक ढुस आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभग गिरमे यांनी केले तर आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत