सात्रळ-सोनगांव/वेबटीम:- परमपिता परमात्मा 'शिव' यांचे दिव्य अवतरणाचे प्रतिक महाशिवरात्री हे पावन पर्व ब्रह्माकुमारी विद्यालयात उत्स...
सात्रळ-सोनगांव/वेबटीम:-
परमपिता परमात्मा 'शिव' यांचे दिव्य अवतरणाचे प्रतिक महाशिवरात्री हे पावन पर्व ब्रह्माकुमारी विद्यालयात उत्साहात साजरे करण्यात आले. या पावन प्रसंगी परमात्मा शिव पित्याचे ध्वजारोहण करण्यात आले, तसेच सम्पूर्ण विश्वाला शांती प्रदान करून वर्तमान तणावाचे वातावरण परिवर्तन करून शक्तिशाली वातावरण तयार व्हावे यासाठी सर्व उपस्थित आत्मिक बंधु-भागिनींनी दररोज 10 मिनिट मेडिटेशन करण्याचा संकल्प केला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना व उद्देश ब्रह्माकुमारी पद्मा दीदींनी सांगितला. कोल्हारहून आलेले ब्रह्माकुमार शिवाजी भाईजी यांनी ईश्वरीय कार्या विषयी माहिती दिली तसेच समयाचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी बाळकृष्ण चोरमुंगे पा. यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. व विजय कडू पा. यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन आभार मानले. या प्रसंगी मंगलाताई चोरमुंगे, उषाताई कडू, जोर्वेकर ताई, प्रकाश वालझाडे, राजेंद्र वालझाडे, वैशाली वालझाडे भाऊसाहेब सजन, सुभाष शेजवळ, बाळु भाऊ गांधी, गोरख दिघे पा. गुरुमुखदास हिरानंदानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ईश्वरीय प्रसाद स्वीकार करून झाली. बी के अर्पणा व बी के अर्चना यांनी ईश्वरीय संदेश असलेले कार्ड व पर्चे सात्रळ ,सोनगांव ,धानोरे परिसरात घरोघर देऊन ईश्वरीय संदेश दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत