श्रीरामपूर/वेबटीम:- अशोकच्या कार्यक्षेत्रात संगमनेर कारखान्याने नोंदी घेतलेल्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत करावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा शेतक...
श्रीरामपूर/वेबटीम:-
अशोकच्या कार्यक्षेत्रात संगमनेर कारखान्याने नोंदी घेतलेल्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत करावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे यांच्या शिष्टमंडळाने ऍड अजितराव काळे उपाध्यक्ष शेतकरी संघटना म. राज्य यांच्या नेत्रुत्वा खाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याचे नावे निवेदन देण्यात आले दि 1/3/2022रोजीश्रीरामपूर येथे उद्घाटनासाठी नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात येणार होते. परंतु ते येऊ न शकल्यामुळे अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे यांचेकडे निवेदन देऊन मागणी केली
मागील गेल्या दहा वर्षापासून संगमनेर कारखाना अशोकाच्या कार्यक्षेत्रातून मोठयाप्रमाणात नोंदी घेऊन ऊस घेऊन जात आहे. संगमनेर कारखान्याला कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्द नसलेले प्रसंगी अशोकमार्फतही मोठयाप्रमाणात अशोकच्या कार्यक्षेत्रातून ऊस नेला जातो. आज रोजी अशोकच्या कार्यक्षेत्रात अशोकच्या गळपक्षमतेपेक्षा जादा ऊस उपलब्ध असूनही अशोकानेही मोठ्या प्रमाणात बाहेरून ऊस आणला व आणत आहे. त्यामुळे अशोकाचाही तोडणी प्रोग्राम पूर्णतः कोलमडला आहे. संगमनेर कारखान्याने नोंदी घेतलेला ऊस अशोकसह कुठलाही कारखाना तयार नाही. संगमनेर कारखान्याने अशोकच्या व्यवस्थापणाचे ऐकून नोंदी घेतलेल्या ऊसाच्या तोंडी बंद केल्या असून वैजापूर तालुक्यातून बिगर नोंदलेला ऊस आणत आहे. तोंडी येणेचे अपेक्षेने शेतकऱ्यांनी ड्रीप गोळा केले. दोन दोन महिन्यापासून ऊसाचे पाणी बंद केले. अश्या परिस्थिती महावितरण कंपनी विज बिल वसुलीसाठी 1-1महिना ट्रान्स्फार्मर बंद करत आहे. या सर्व बाबीमुळे अशोकाच्या कार्यक्षेत्रातील ऊसाच्या खोडक्या झाल्या आहे. शेतकऱयांचे एकरी वीस टनाच्या आसपास आधीच नुकसान झाले आहे.एप्रिल मे मध्ये ऊसाला तोडण्यासाठी धजणार नाही. अश्या बिकट संकटात ऊस उत्पादक असताना विज बिले भरायची कशी असा प्रश्न व्यवस्थेमुळे निर्माण झाला आहे. या सर्व बाबीमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी मे मंत्री महोदयांनी आपल्या कारखान्याने नोंदी घेतलेल्या ऊसला तातडीने नियमाप्रमाणे तोंडी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर स्वाभिमानीचे जितेंद्र भोसले, श्रीरामपूर ता. अध्यक्ष युवराज जगताप, नेवासे ता. अ. हरिभाऊ तुवर, गोविंद वाघ, सुदामराव औताडे, संजय वमने, बाबासाहेब गलांडे, प्रकाश जाधव, प्रभाकर कांबळे, प्रभाकर तुवर, किशोर पाटील, शरद पवार आदींच्या सह्या आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत