कोपरगाव/वेबटीम:- शिक्षण महर्षी लहान भाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि.१मार्च रोजी शिक्षण महर्षी लहानभाऊ नागरे यांची ८४ वी जय...
कोपरगाव/वेबटीम:-
शिक्षण महर्षी लहान भाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि.१मार्च रोजी शिक्षण महर्षी लहानभाऊ नागरे यांची ८४ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली . विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदारसंघाचे
विद्यमान आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब व संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई सुधीरजी तांबे यांसह विविध क्षेत्रांतील
दिग्गज मान्यवरांच्या हस्ते 'जयंती सोहळा ' निमित्ताने शिक्षण महर्षी
लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान ,रेन्बो इंटरनॅशनल स्कूल व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक ,अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल प्राध्यापक ज्ञानदेव नामदेवराव सांगळे यांना 'जीवनगौरव ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'आरोग्य निदान शिबिराचे ' उद्घाटन माजी नगराध्यक्ष पद्माकांतजी कुदळे यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे 'मिरीट स्कॉलरशिप परीक्षेची घोषणा करण्यात आली ही परीक्षा इयत्ता ६ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी असुन यात अनुक्रमे १ते ३ क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना इ.१०वी पर्यंत मोफत शिक्षण देणार असल्याची माहीती कार्यकारी संचालक आकाश नागरे यांनी दिली आहे.
डॉ.सुधीर तांबे अण्णांच्या जीवन कार्याबद्दल माहीती देताना म्हणाले की शेतकरी कुटंबात जन्म घेतलेल्या अण्णांचे शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान आहे. त्यांनी मुलांना गावातच शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी हॅरीसन ब्रँच प्राथमिक शाळेसाठी आपल्या मालकीची २० गुंठे जमिन दान केली व पुढे त्यांनी जेऊर कुंभारी परीसरात २०११ साली रेंन्बो इंटरनॅशल स्कूलची स्थापना केली .कोपरगाव तालुक्यात शेतकरी व बहुजन समाजातील तळागाळातील घटक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे व माजी मंत्री सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या सोबत काम केले असुन आज मितीला या समाजाला अण्णांसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले,सांगळे सरांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असुन जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड उचित असल्याचे आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले .
सत्कारमुर्ती ज्ञानदेव सांगळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मला मिळालेला हा पुरस्कार माझा नसुन माझ्या तमाम शिक्षक बांधव व मार्गदर्शन करणाऱ्या सहकाऱ्यांचा गौरव आहे की ज्यांच्यामुळे मी आत्मविश्वासाने वाटचाल केली.शिक्षकांनी स्वतःला आपल्या कामात झोकुन दिले तरच पुढची सक्षम पिढी तयार होणार आहे .आदर्श शिक्षक पुरस्कार नव्हे तर शिक्षकच आदर्श असला पाहीजे असे ते म्हणाले शेवटी त्यांनी पुरस्कार दिल्याबद्दल श्रद्धेने व लीनतेने आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्वत सर व नंदीनी वक्ते यांनी तर प्रास्ताविक रेन्बो इंटरनॅशल स्कूलचे कार्यकारी संचालक - आकाशजी नागरे यांनी केले तर सचिव - संजयजी नागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .या प्रसंगी
माजी नगराध्यक्ष पद्मकांतजी कुदळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष व उद्योजक राम थोरे, पार्वतीबाई नागरे,वनिताताई नागरे , रत्नमाला ताई सांगळे ,नितीन शिंदे, विजय रोहम, संस्थेचे अध्यक्ष
कांतीलालजी अग्रवाल , विश्वस्त -मनोजजी अग्रवाल, विश्वस्त - आनंदजी दगडे ,शिवाजी घुले, प्रशांत घुले
वसंतराव आव्हाड, शरदनाना थोरात,
बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, विठ्ठलराव आव्हाड, विलासराव आव्हाड, रामभाऊ आव्हाड, राजेंद्र गिरमे, माधवराव दौंड, रगनांथ आव्हाड, सचिन आव्हाड,
प्रशासक सुरेशजी शिंदे, उप-प्राचार्य - प्रविण कदम, सोमनाथ सोनवणे , प्रशांत भास्कर
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी
आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत