आंबी(वेबटीम) माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या स्नुषा व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या पत्नी दिपाली ससाणे यांची युवक काँग्रेसच्...
आंबी(वेबटीम)
माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या स्नुषा व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या पत्नी दिपाली ससाणे यांची युवक काँग्रेसच्या महासचिव पदी नुकतीच निवड झाली. या निवडीबद्दल केसापूर (ता. राहुरी) काँग्रेस पक्ष व विवीध कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन संचालकांच्या वतीने ससाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी करण ससाणे, हेमंत ओगले आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी केसापूरचे माजी सरपंच गुलाबराव डोखे, काँग्रेस तालुका सरचिटणीस दिपक पवार, सुदाम टाकसाळ, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र खैरे, मच्छिंद्र पवार, गोकुळ टाकसाळ, बंडु टाकसाळ, सतिश टाकसाळ, बाळकृष्ण मेहेत्रे, भाऊसाहेब डोखे, राजेंद्र टाकसाळ, ललित टाकसाळ, मारुती टाकसाळ, उत्तम बोल्हे, मधुकर रणदिवे, रमेश टाकसाळ, अक्षय पवार आदी केसापूर ग्रामस्थ उपस्थित होते.
युवक काँग्रेसच्या नूतन महासचिव दिपाली करण ससाणे यांचा सत्कार करताना केसापूर काँग्रेस पक्ष व सहकारी सेवा संस्थेचे नूतन संचालक मंडळ. (छाया : अक्षय पवार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत