कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात अतिक्रमण या नावाखाली प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर केलेल...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात अतिक्रमण या नावाखाली प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर केलेल्या कारवाईचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे.केवळ एखाद्या मंत्र्याच्या आगमनासाठी जनतेच्या रोजी रोटी असलेल्या दुकानांची राखरांगोळी करून पायघडी टाकण्याचा दुर्दैवी प्रकार कोपरगाव शहरात घडला असल्याचे आरिफ कुरेशी यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात अक्षरशः व्यवसाय ठप्प असल्याने उपासमारीची स्थिती होती, त्यातून काहीसे सावरता न सावरता तेच प्रशासनाने कुणाच्या आदेशाने हातोडा चालवत गाव उजाड करण्याचा विडा उचलला आहे..? अतिक्रमण या शब्दाचा कांगावा करत २०११ साली देखील माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात शहरात हजारो नागरिक विस्थापित झाले,त्यांची अद्यापही सोय लागलेली नसतांनाच २०२२ ला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रकार घडला आहे.काळे कुटूंबीय सत्तेत असतांनाच हा प्रश्न कसा उद्भवतो व नेमके काळे यांनाच अतिक्रमण दिसतात का अशी जनभावना झाली आहे.राजकीय दौरे यापूर्वी शहराने माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या काळात बघितले पण कधीही असे नेत्यांच्या स्वागतासाठी शहराची दुकाने काढलेली नाहीत,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त आपले शहर मोकळे करण्याचा विडा कोल्हे यांनी उचलला नाही मात्र तेच उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या स्वागतासाठी हातोडा मोहीम आमदार काळे यांनी राबवली अशी चर्चा शहरात सुरू आहे.ज्या उद्घाटनासाठी ना.अजित पवार येणार आहेत ती विकासकामे आमदार काळे यांच्या कार्य काळातील नाहीत व त्यासाठी निधीही त्यांनी आणलेला नाही,या विकास कामांसाठीचा निधी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आनलेला आहे.परंतू सवयीप्रमाणे श्रेय लाटण्याच्या केविलवाण्या प्रयत्नातून आमदार काळे यांनी त्या कामांच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे.श्रेयाच्या मूळ मुद्यावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे म्हणून चक्क नागरिकांच्या रोजीरोटीवरच प्रशासनाचे नाव वापरून घाला घालण्याचे पातक आ.काळे यांनी केले आहे अशी जनतेत कुजबुज आहे.
भाजपा सेनेचे नगरसेवक यांची मुदत संपलेली आहे व सध्या पालिकेत प्रशासक कार्यरत आहे.त्यामुळे राष्ट्रवादीचे नेहमीप्रमाणे कोल्हे गटाचे नाव घेऊन साप साप म्हणून भुई बडवणे देखील आता उपयोगाचे राहिले नाही.राज्यात सत्ता यांची,आमदार यांचे व प्रशासकही यांच्या आदेशानुसार काम करतात.मग ही कारवाई कुणाच्या आदेशावरून झाली हे जनतेला न समजण्याएवढी जनता दूधखुळी नाही.वास्तविक पाहता मुख्यरस्त्यावरील अडथळे बाजूला करावे एवढाच उद्देश असतांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री.गंगूले यांनी कारवाई स्थळी जाऊन प्रसिध्दीच्या हव्यासापोटी आगीत तेल ओतण्याचे काम केले.त्यांनी गावातील सर्व अतिक्रमणे काढा अशी आडमुठी भूमिका घेतली त्या संदर्भातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्याही उपलब्ध आहेत.त्यांनी १४ ते १५ वेळा एकच वाक्य रेटून ही मागणी लावून त्यामुळे शहरातील इतरही दुकानांवर हातोडा पडण्याची परिस्थिती ओढवली गेली.
यावरूनच यापूर्वी जे काही प्रकार घडले त्यात कोण शहर विरोधी होते हे आता या प्रकारामुळे पूर्णपणे उघड झाले आहे.जर विद्यमान आमदार काळे हे जर एवढे वजनदार नेते आहेत तर मग ही कारवाई का थांबवली गेली नाही..? जनतेला वेळ का दिला गेला नाही..? प्रशासन आमदारांच्या सुचनेशिवाय काम करतात का ? हे आता साऱ्यांना कळून चुकले आहे व या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण शहर व्यथित असून सामंजस्याने मार्ग निघाला असता तर नागरिकांची हरकतही नसती पण अचानकपणे घडलेली ही घटना शहराच्या इतिहासात आणखी एक काळा दिवस म्हणून नोंदवली गेली आहे अशी प्रतिक्रिया आरिफ कुरेशी यांनी दिली आहे.
धरणगाव रोड वर ज्या अनधिकृत दुकाना रात्री चालतात त्या पण कायमस्वरूपी बंद करायला पाहिजे
उत्तर द्याहटवाखास करून पोस्ट ऑफिस समोर