कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात शिवसेनेच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने भव्य दिव्य स्वरूपात शिवसेना जिल्हा प...
कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव शहरात शिवसेनेच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने भव्य दिव्य स्वरूपात शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिथी नुसार साजरी केली जाणार आहे.कोपरगावात तिथी प्रमाणे शिव जन्म उत्सव सोहळा दि.१९ ,२० ,व २१ मार्च २०२२ रोजी शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचे ठरविले होते.यावर्षी मोठ्या स्वरूपाचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.यामध्ये कला,नृत्य, संगीत, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आहे.
यामध्ये मुंबईचे संघ सहभागी होणार आहे. शहरात जोदरार तयारी चालु असतांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे दि १६ मार्च २०२२ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले त्यामुळे समस्त कोपरगावकरांवर व तालुक्यावर शोककळा पसरली असल्यामुळे हा दि १९,२० व २१ मार्च २०२२ चा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे असा निर्णय शिव जन्मोउत्सव समितीचे अध्यक्ष शेखर कोलते,उपाध्यक्ष दत्तु पगारे,इरफान शेख,किरण अढांगळे,बाळासाहेब सांळुके,राहुल देशपांडे,सागर सोमवंशी, विकास शर्मा, सतिष खर्डे,राकेश वाघ,अमजत शेख,भुषण वडांगळे, यांनी घेतला आहे.दि.२१ मार्च २०२२ रोजी शिव जन्मोउत्सव निमित्ताने सकाळी ५:३० वाजता विधीवत शिव अभिषेक धार्मिक विधी पुजन होणार असुन पुढील पूर्व नियोजित कार्यक्रम पुढील महिण्यात गुढीपाडव्याच्या मुहर्तावर २ एप्रिल रोजी होणार आहे. २ ,३ व ४ एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. शिव प्रेमी, शिवसैनिक,कोपरगावातील नागरिकांनी,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यी यांनी याची नोद घ्यावी असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांनी केले आहे.दरवर्षी प्रमाणे सर्वांनी सहकार्य करावेे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत