कोळपेवाडी प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा या पंचवार्षिक निवडणूकीच्...
कोळपेवाडी प्रतिनिधी –
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा या पंचवार्षिक निवडणूकीच्या वेळी देखील कायम राहीली आहे. मा.आ.अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत काळे गटाचे सर्वच्या सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ते सदस्य पुढीलप्रमाणे ना.आशुतोष अशोकराव काळे, संजय गोविंदराव काळे, अशोकराव विश्वनाथ काळे, मधुकर भानुदास काळे, यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख, भरत बाबुराव दाभाडे, वसंतराव आसाराम काळे, शिवाजी देवराम लांडगे, जगन्नाथ विश्वनाथ जाधव, सौ.संगीता सूर्यभान काळे, सौ.उर्मिला चंद्रकांत कापसे, भागीनाथ कारभारी काळे, डॉ.शिवाजी भानुदास रोकडे यांचा समावेश आहे.
संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. चेअरमन पदासाठी संजय गोविंदराव काळे व व्हा.चेअरमन पदासाठी डॉ.शिवाजी भानुदास रोकडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निडणूक निर्णय अधिकारी एन.जी.ठोंबळ यांनी चेअरमनपदी संजय गोविंदराव काळे व व्हा. चेअरमनपदी डॉ. शिवाजी भानुदास रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. निवडणूककामी आर. एन. रहाणे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, संस्थेचे माजी चेअरमन रविंद्र काळे, मा. व्हा.चेअरमन प्रकाश काळे, सूर्यभान काळे, चंद्रकांत कापसे, संस्थेचे जनरल मॅनजर बी.जी.सय्यद, सचिव संदीप बोरनर आदी मान्यवरांसह सोसायटीचे सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन संजय काळे, व्हा.चेअरमन डॉ. शिवाजी रोकडे व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत