राहुरी/वेबटीम:- गेल्या काही दिवसांपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रकल्प शेतकरी उपोषणास बसले असून त्यांना न्याय न दिल्...
राहुरी/वेबटीम:-
गेल्या काही दिवसांपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रकल्प शेतकरी उपोषणास बसले असून त्यांना न्याय न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.
तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक दराडे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, म.फु.कृ. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपावेतो शेतक-यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही समस्या विद्यापीठ प्रशासनाने सोडविलेल्या नाहीत. यापुर्वी विद्यापीठ प्रशासनाला या समस्या सोडविण्यासाठीचे सर्व आदेश प्रदान झालेले होते. परंतु आपण तसे न करता आपल्या विदयापीठातील अधिकारी, कर्मचा-यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याऐवजी वेळोवेळी झालेल्या नोकरभरतीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होवून नोकर भरती झाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय मिळाला नाही व आजपावेतो त्यांचेवर वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्याची वेळ आपल्या प्रशासनाने आणलेली आहे व यांस सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार आहे. १४ मार्च पासून प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज ४ था दिवस असुन उपोषणार्थीची प्रकृती ढासाळत चालली आहे. मात्र सदरील उपोषण थांबविणेसाठी जलदगतीने प्रयत्न करून उपोषणार्थीना योग्य न्याय देवून उपोषण थांबवावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश देठे, आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली नननोर, अश्विनी पवार, तेजश्री गागरे, अर्चना तोंडे, लिलाबाई बाचकर, शारिणी कारंडे, तुळसाबाई शेडगे आदिंसह महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत