सात्रळ(वेबटीम):- अतिशय दयनीय अवस्था झालेल्या सात्रळ तांभेरे रस्त्याचे कामास अखेर मुहूर्त लागला असून सदर काम जोमात चालू झाले आहे. "...
सात्रळ(वेबटीम):-
अतिशय दयनीय अवस्था झालेल्या सात्रळ तांभेरे रस्त्याचे कामास अखेर मुहूर्त लागला असून सदर काम जोमात चालू झाले आहे. "या रस्त्याच्या दयनीय स्थिती बद्दल " आवाज जनतेचा "वेबपोर्टलने आवाज उठविल्याबद्दल नागरीकांनी आवाज जनतेचा वेबटीमचे आभार मानले.
सात्रळ -तांभेरे रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महत्वाचा असल्याने या रस्त्यावरून नेहमी वाहतुकीची वर्दळ असते तसेच नगर मनमाड रस्त्यावर कोल्हार पुलावर वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर होत असून परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळेस लोकप्रतिनिधी ना या रस्त्याच्या दयनीय स्तिथी बद्दल निवेदने, समक्ष भेटून मागणी केलेली होती. अखेर परिसराचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी या रस्त्यांची परिस्तिथी पाहून या रस्त्याच्या दुरुस्ती , डांबरीकरण कामासाठी एक कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला आहे.रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी व लवकरात लवकर चालू होण्यासाठी विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांनी पाठपुरावा करून अखेर हे काम चालू झाले असून रस्त्याचे काम दर्जेदार होण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत