कोपरगांव/वेबटीम:- संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, महसुल, कृषी, सहकार, परिवहन, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजीम...
कोपरगांव/वेबटीम:-
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, महसुल, कृषी, सहकार, परिवहन, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजीमंत्री व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सुत्रधार संचालक, सहकाररत्न, शंकरराव गेनूजी कोल्हे ( ९३ ) यांचे बुधवारी १६ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजता नाशिक येथील सुश्रुत हॉस्पीटल येथे वृध्दापकाळाने निधन झाले.
१९७२ ते १९८४ तर १९९० ते १९९९ या काव्यात ते महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी तर १९९९ ला महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते, २०१५ पासुन ते अर्धांगवायूच्या आजाराने आजारी होते परंतु त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या ८६ व्या वर्षीही या आजारावरही मात केली होती.
संजीवनी सैनिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी कोल्हे यांना मानवंदना दिली. पोलिस दलाच्यावतीने तिरंगी ध्वजाने कोल्हे यांचा पार्थीव लपेटण्यांत आली व त्यांनीही मानवंदना दिली. कोल्हे यांच्या निधनाबददल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकरराव पिचड, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ सुजय विखे, माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे, शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार अशोकराव काळे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, यांच्यासह राज्यभरातील तसेच सहकार क्षेत्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे यांचे वतीने प्रदीप पळसे यांनी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे, राम शिंदे, यांनी शंकरराव कोल्हे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानाच्या स्मृतीस्थळावर शोकाकुल वातावरणात ३ बंदुकींच्या फैरी झाडत शासकीय इतमामात मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यांत आले. ज्येष्ठ सुपुत्र नितीनदादा कोल्हे यांनी कोल्हे यांच्या पार्थीवाला ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात अग्निडाग देण्यात आला.
याप्रसंगी पत्नी श्रीमती सिंधुताई कोल्हे, बंधु दत्तात्रय कोल्हे, मुलगी श्रीमती निलीमा वसंतराव पवार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, डॉ मिलींददराव कोल्हे, भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटयचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते विवेक कोल्हे, ईशान कोल्हे, डॉ प्राची वसंतराव पवार, कृपाशंकर सिंह पोलीस अधीक्षक मनोज पाटील नांदगावचे आमदार अनिल आहेर संभाजीराव फाटके शिवाजीराव कर्डिले, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, भाजपाचे प्रांतीक सदस्य रविंद्र बोरावके, माजीनगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राजेंद्र झावरे, मंगेश पाटील, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, योगेश बागुल, दिलीप दारूणकर, राजेंद्र शिंदे, सुरेखा विनोद राक्षे, मिनल अशोक खांबेकर, माजी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशन कोपरगाव बार असोसिएशन, पत्रकार, आदि मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली व शोक व्यक्त केला. शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबदल कोपरगांव, कोपरगांव औद्योगिक वसाहत, संजीवनी उद्योग समुहावा परिसर उत्सर्त बंद पाळुन दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आला होते.
ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या अग्नीडाग अंतिम अंत्यसंस्कार प्रसंगी हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातुन पुष्पवृष्टी करण्यात आली. अंतिम अंत्ययात्रेच्यावेळी संजीवनी कारखाना ते संजीवनी इंजिनियरींग कॉलेजच्या दोन्ही बाजुने जमलेल्या हजारो पुरुष महिला, तरूण तरूणी व अबाल वृध्दांनी पुष्पवृष्टी करून चाहते नेते शंकरराव कोल्हे यांचे अंतिम दर्शन घेतले.
अंत्यसंस्कारप्रसंगी मान्यवरांनी वाहिलेल्या श्रध्दांजली पुढील प्रमाणे 👇
बाळासाहेब थोरात-महसुलमंत्री महाराष्ट्र राज्य:- राज्याच्या राजकारणात समाजकारणात काळे कोल्हे यांनी कुठे लढावे व कुठे थांबावे हे आम्हां तरूणांना शिकवले. आमच्या सारख्या असंख्य नवख्या आमदारासह मंत्री महोदयांनी सांभाळुन घेण्याचे काम करून मार्गदर्शन केले. राज्याच्या नेतृत्वाची धुरा एकेकाळी सांभाळली. कोल्हे यांचे तांत्रीक ज्ञान अफाट होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांना त्यांनी सांभाळुन घेतले काळे कोल्हे यांचे राजकीय मतभेद होते व व्यक्तीद्वेष कधीही नव्हता हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो ते राज्याने आत्मसात करायला हवे.
चंद्रकांत पाटील-प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्ष:- माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी पाणीप्रश्नांसह अनेक प्रश्नांवर लढे दिले त्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम झाला. राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक वेगवेगळी कामे केली अनेकांना उभे करण्याचे काम केले. माजीमंत्री शंकरराव कोल्हे वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणांत आले सरपंच पदापासून ते राष्ट्रीय पदापर्यंत त्यांनी अनेक पदावर काम केले असा नेता आता पुन्हा होणे नाही. त्यांचे आदर्श विचार प्रत्येकाने आचरण केले तर तीच त्यांना श्रध्दांजली ठरेल.
आमदार राधाकृष्ण विखे:-
ज्येष्ठनेते शंकरराव कोल्हे यांनी संपुर्ण आयूष्य सहकार चळवळीसाठी खर्च करत त्याची सतत पाठराखण केली. पाणीप्रश्नी अवरित काम केले. आज खरोखरच योध्दा हरपल्याची भावना सर्वसामान्यासह आमच्या कुटूंबियांना झाली असल्याचे सांगत श्रध्दांजली वाहिली.
आमदार आशुतोष काळे अध्यक्ष साईबाबा संस्थान:-
शिर्डी कोपरगांव तालुक्याचा राज्यात वेगळा दबदबा होता. ज्येष्ठनेते शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे या दोघांचे सख्य होते. त्यांची नांवे निघाली की कोपरगांवची ओळखराज्यभर रहायची. राजकीय मतभेद जरूर असावेत पण विरोधाला ठरावीक मर्यादा असाव्यात हे त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहे.
आमदार मोनिका राजळे:-
ज्येष्ठनेते शंकरराव कोल्हे यांचे कार्यकर्तृत्व मोठे होते त्यांच्या जाण्यान आज अहमदनगर जिल्हयासह राज्य पोरका झाला अशा शब्दात त्यांनी हृध्दांजली वाहिली.
माजी मंत्री राम शिंदे:-
वयाच्या २१ व्या वर्षी परदेशात शिक्षण घेवून येणारे शंकरराव कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल करत बदलत्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत नव्या पिढीला हुशार केले. राज्याच्या आदरणीय व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होता. विकासाच्या जडणघडणीत त्यांनी उभा केला हातखंडा सर्वांना आदर्शवत आहे. त्यांचे कार्य सर्वांनाच मार्गदर्शक राहणार आहे.
आमदार डॉ सुधीर तांबे:-
राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी ज्येष्ठनेते शंकरराव कोल्हे यांनी सर्वांच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांची प्रेरणा आम्हाला व तरुणांना प्रेरणादायी राहिल ते जिल्हयाबरोबरच राज्याचे रोलमॉडेल होते. त्यांचा करारीपणा शिस्तबध्दपणा वाखाणण्याजोगा होता. माजी आमदार मारोतराव पवार ज्येष्ठनेते शंकरराव कोल्हे यांच्या जाण्याचे राज्यासह अहमदनगर नाशिक जिल्याची मोठी हानी झाली असून ही पोकळी भरून निघणारी आहे.
अँड भगिरथ शिंदे-उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था सातारा:-
शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव पाहता काळे कोल्हे हे आमच्यासाठी नेहमी आदर्शवत होते शिक्षण क्षेत्रात त्यांचे पराकोटीचे काम आहे. रयतेचा विस्तार राज्यात करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे- श्रीरामपुर अहमदनगर जिल्हयाच्या राजकारणात शंकरराव कोल्हे याचा सिहाचा वाटा होता त्यांच्या जाण्याने जिल्हयाचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार मानूदास मुरकुटे श्रीरामपुर राजकारणात संघर्ष करणारा आणि वेळप्रसंगी वादळ निर्माण करणारे व्यक्तीमत्व म्हणजे शंकरराव कोल्हे, अहमदनगर जिल्हयाचे नाव राज्यात त्यांनी मोठे केले. से होते अष्टपैलू नेता माणून आम्ही त्यांच्याकडे पहायचो.
मणिकराव बोरस्ते-मराठा विद्या प्रसारक मंडळ ,नाशिक -ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी अहमदनगर नाशिक जिल्हयाला कर्तृत्वाची दिशा देत प्रत्येक प्रश्नावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजाभाऊ वाजे, राजेंद्र नागवडे, उध्दव महाराज मंडलिक, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, देवगड देवस्थानच्यावतीने संतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, श्रीरामपूर च्या नगराध्यक्ष अनुराधा अधिक, नगराध्यक्षा दुर्गा ताई तांबे आदिनी श्रद्धांजली अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत