राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील हजरत चांदशहावली उर्स कमेटीच्या अध्यक्षपदी मतीन देशमुख, उपाध्यक्षपदी तोहिद पिरजादे...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील हजरत चांदशहावली उर्स कमेटीच्या अध्यक्षपदी मतीन देशमुख, उपाध्यक्षपदी तोहिद पिरजादे यांची तर खजिनदारपदी नईम देशमुख यांची निवड करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून चांदशहावली दर्ग्याचा उर्स, संदल व कवालीचा कार्यक्रम कोरोनामुळे ठप्प होता. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये रफिक ईनामदार, इम्रान देशमुख, उपसरपंच प्रा. इजाज सय्यद, रफिक शेख, नबाब पटेल, वायबी देशमुख, राजू शेख यांनी मनोगत व्यक्त करीत आगामी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
सर्वानमुते अध्यक्षपदी मतीन अब्दुल वहाब देशमुख, उपाध्यक्षपदी तोहिद यासिन पिरजादे यांची तर खजिनदारपदी नईम अजीज देशमुख यांच्या निवडीचा ठराव संमत करण्यात आला. निवडीनंतर पदाधिकार्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार्या बारागाव नांदूर येथील चांदशहावली दर्ग्याचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करणार असून संदल,कवालीचा कार्यक्रम होणार असल्याचे निवडीत पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कमेटीचे सदस्य हबीब देशमुख, रहेमान देशमुख, यासिन पिरजादे, मुस्लीम पंच कमेटीचे अध्यक्ष शौकत इनामदार, उपाध्यक्ष आरीफ देशमुख, संतोष शिंदे, रईस सय्यद, जाकीर पठाण, फिरोज देशमुख, अमजत पिरजादे, मुनीर शेख, समीर पिरजादे, नसीर सेठ, जावेद पिरजादे, पप्पू पटेल, बबलु इनामदार, वसीम देशमुख, तमीज पठाण, अमजद नाना, सिराज इनामदार आदींसह बत्तीस बत्तीस ग्रूप, एम आझाद गू्रप. सेठ ग्रूप कमेटीचे सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत