उंबरे : वेबटीम उबरे सोसायटीसाठी काल आणखी काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये बबनराव पुंजा ढोकणे, दत्तात्रय पांड...
उंबरे : वेबटीम
उबरे सोसायटीसाठी काल आणखी काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये बबनराव पुंजा ढोकणे, दत्तात्रय पांडुरंग ढोकणे, भाऊसाहेब नामदेव तांबे, भाऊसाहेब भानुदास साबळे, संदीप बाळासाहेब दुशिंग, साहेबराव चंद्रभाग दुशिंग, विष्णु रंगनाथ भापकर, दत्तात्रय रामभाऊ दुशिंग, विजय बाबुराव ढोकणे, शिवाजी भाऊसाहेब ढोकणे, भाऊसाहेब फकिरा वैरागर यांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित, आणि यांचे चुलते अशोक पंडित यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असून, दोघांनी प्रचारही सुरू केला आहे.
यातील संदीप दुशिंग यांचा ओबीसीतून, तर साबळे आणि वैरागर यांचा अनु. जाती प्रवर्गातून अर्ज दाखल आहेत. आतापर्यंत एकूण 35 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या गुरुवारी विक्रमी अर्ज दाखल होणार असून, काही दिग्गज इच्छूक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत