राहुरी( प्रतिनिधी) तालुक्याच्या प्रवरा पट्ट्यातील धानोरे (दिघेवस्ती) येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्याचा रे...
राहुरी(प्रतिनिधी)
तालुक्याच्या प्रवरा पट्ट्यातील धानोरे (दिघेवस्ती) येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्याचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने पालकांसह विद्यार्थी ग्रामस्थांमधे घबराटीचे वातावरण आहे.
धानोरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी स्वराज योगेश घोडके याचा शुक्रवार दिनांक ११ मार्चला वाढदिवस होता. यानंतर दिनांक १२ मार्चला शनिवारी स्वराज शाळेत गेला असता त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला असता त्यास गावातील खाजगी दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले असता डॉक्टरांनी लोणी येथील पीएमटीला नेण्यास सांगितले त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वराजला नगर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यास सांगितले.यानंतर पालकांनी नगरला सिव्हिल येथे नेले असता तेथेही उपचार पद्धती उपलब्ध नसल्याने पुण्याच्या ससून या शासकीय रुग्णालयात नेले असता तेथेही उपचार न मिळाल्याने खाजगी रुग्णालय येथे नेले मात्र स्वराज याचा वेळीच उपचार व निदान न मिळाल्यामुळे दिनांक १५ मार्च रोजी मृत्यू झाल्याने स्वराजच्या पालकांसह गावात शोककळा पसरली.
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्याचा रेबीजने मृत्यू झाल्यामुळे धानोरे गावात पालक वर्गासह विद्यार्थ्यांमधे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान आज धानोरे येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी शालेय व्यवस्थापण समिती व ग्रामस्थांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अँटीरेबीज लस उपलब्ध करून द्यावि अशी मागणी केली. त्यावर डॉ. दिपाली गायकवाड यांनी गुहा व सात्रळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात अँटीरेबीज लस उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लस घ्यावी. काही अडचण वाटल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत