कोपरगाव प्रतिनिधी :- आश्वासन हे लोकशाहीचा एक भाग आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की, राजकीय नेत्यांकडून आश्वासनांची खैरात केली जाते. या आश्वास...
कोपरगाव प्रतिनिधी :-
आश्वासन हे लोकशाहीचा एक भाग आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की, राजकीय नेत्यांकडून आश्वासनांची खैरात केली जाते. या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण होतात हा संशोधनाचा विषय असला तरी ना. आशुतोष काळे याला अपवाद आहेत. पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासने पूर्ण करण्यासाठी तहानभूख विसरून त्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी निधी मिळाला असून ना. आशुतोष काळे यांनी जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय उंबरकर यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हे सुटणारे कोडे जनसामान्यांप्रती बांधिलकीचा अभाव असल्यामुळे न सुटणारे कोडे होवून बसले होते. २०१०-११ मध्ये ४ नंबर साठवण तलावासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील २ कोटीचा निधी आणला होता. मात्र श्रेयवादामुळे हा निधी परत गेला होता. त्यामुळे पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले होते. २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी देखील सर्व पक्षीयांकडून पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले. निवडणूक निकालानंतर ज्यांच्याकडे पालिकेची सत्ता नव्हती ते काही करू शकले नाही. मात्र ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांना सत्ता आल्यावर दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला होता.
त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा सर्वपक्षीयांनी पुन्हा उचलला. त्यावेळी ना.आशुतोष काळे यांनी देखील निवडणुक प्रचारात शहरवासीयांना सत्ता द्या, पाणी प्रश्न सोडवून दाखवतो असे आश्वासन नव्हे तर ग्वाही दिली होती.त्यावर शहरवासीयांनी उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवला. ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेवून विधानसभेत पोहोचलेल्या ना. आशुतोष काळेंनी सत्तेचा त्यातही सत्ताधारी आमदार असल्याचा खुबीने वापर करून मतदार संघातील विकासाचे एकेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. त्याचबरोबर कोपरगावकरांचा मागील अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करून ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी निधीला प्रशासकीय मंजुरी मिळविली. अडीच वर्षातच कोरोनासारख्या संकटात आर्थिक व्यवस्था अडचणीत असतांना प्रतिकूल परिस्थितीत दिलेले आश्वासन पूर्ण करून ना. आशुतोष काळेंनी जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे. त्यामुळे यापुढे देखील जनता ना.आशुतोष काळे यांच्याबरोबर राहील असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय उंबरकर यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत