सात्रळ ग्रुप सोसायटी निवडणूकित विश्वासराव कडू यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाचे यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ ग्रुप सोसायटी निवडणूकित विश्वासराव कडू यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाचे यश

सात्रळ (वेबटीम) राहुरी  तालुक्यातील  अग्रगण्य  असलेल्या, तसेच सभासदांना  12टक्के  लाभांश वाटणाऱ्या  सात्रळ ग्रुप  वि. वि. का. सोसायटी च्या  ...

सात्रळ (वेबटीम)



राहुरी  तालुक्यातील  अग्रगण्य  असलेल्या, तसेच सभासदांना  12टक्के  लाभांश वाटणाऱ्या  सात्रळ ग्रुप  वि. वि. का. सोसायटी च्या  नुकत्याच  झालेल्या चुरशीच्या  निवडणुकीतसात्रळ ग्रुप  सोसायटी  निवडणूकिता विश्वासराव  कडू यांच्या  नेतृत्वाखालील  जनसेवा  मंडळाचे   यश.  विखे साखर  कारखान्या चे उपाध्यक्ष  विश्वासराव  कडू यांच्या  नेतृत्वाखालील  जनसेवा  मंडळाने सर्वांचा सर्व  १२  जागा जिकूंन घवघवीत  यश मिळविले आहे. 




निवडणूक  अत्यंत चुरशीची असल्याने  परिसरातील  जनसामान्यांचे  या निकालाकडे लक्ष होते.सोसायटी च्या निकालाने परत  एकदा विखे कारखान्याचे  उपाध्यक्ष  विश्वासराव  कडू यांच्या  नेतृत्वावर सभासदानी विश्वास  व्यक्त  केल्याचे स्पष्ट  होतानाचे चित्र आढळून  येत  आहे.  


विखे  कारखान्याचे उपाध्यक्ष  विश्वासराव  कडू यांना  प्रचारात ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे, ऍड. अप्पासाहेब  दिघे, दिलीपराव  ज्ञानदेव डुक्रे, वसंतराव  डुक्रे, शिवाजीराव  घोलप  यांनी  मोलाची साथ देऊन पूर्ण  पॅनल  निवडून  आणला. या निवडणुकीत जनसेवा  मंडळाचे गोरख जयराम  घोलप, विलास दादा घोलप, बाळकृष्ण  बापूजी  चोरमुंगे, दिलीप ज्ञानदेव  डुक्रे, वसंतराव  भाऊसाहेब  डुक्रे, अतुल भीमराज  ताठे, सुभाष  कारभारी  दिघे, संजय  पांडुरंग नागरे तर इतर मागासवर्ग  मतदारसंघातून प्रकाश लक्ष्मण  ताठे तर महिला  राखीव गटातून  उज्ज्वला विजय  डुक्रे, मंदाकिनी  दिलीप डुक्रे  या विजयी  झाले असून मागासवर्गीय  राखीव मतदार  संघातून  चांगदेव  गोपाळा पडघलमल  हे बिनविरोध  निवडून आले आहेत. 


समोरील पॅनेलचे  नेतृत्व  प्रतापराव  कडू, प्रवरा  बँकेचे  संचालक  साहेबराव  नाल कर, संचालक  बाबुराव  पडघलमल, प्रवरा  बँकेचे माजी उपाध्यक्ष  कारभारी  ताठे, तसेच जेष्ठ  नेते  सुखदेवराव  ताठे इ. दिग्गजा कडे  असूनही  त्यांना  पराभवास सामोरे जावे लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत