राज्यमंत्री तनपुरे यांची गोंदियाच्या पालकमंत्रीपदी अधिकृत निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्यमंत्री तनपुरे यांची गोंदियाच्या पालकमंत्रीपदी अधिकृत निवड

  राहुरी(प्रतिनिधी) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज मंगळवारी अधिकृत रित्या निवड करण्यात आली. गेल्य...

 राहुरी(प्रतिनिधी)



राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज मंगळवारी अधिकृत रित्या निवड करण्यात आली.


गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंबंधीची घोषणा केली होती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची असलेल्या अधिकृत पत्रावर स्वाक्षरी केली.


 सदरील वृत्त राहुरी धडकताच राज्यमंत्री तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना मंत्री तनपुरे यांच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी देण्यात आल्याचे समजताच राहुरी शहरात जल्लोषाला अधिकच उधाण आले. नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नंतर आमदार राज्यमंत्री आता थेट पालकमंत्री पदापर्यंत मंत्री तनपुरे पोहोचल्याने समर्थकांमध्ये उत्साह संचारला तर विरोधी गटात सन्नाटा पसरला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती व शनी मंदिर चौक यासह शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली मंत्री तनपुरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत