राहुरी(वेबटीम) जिल्हा नियोजन समिती जनसुविधा योजनेअंतर्गत राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील दहा गावांना स्मशानभूमी विकास करण्यास...
राहुरी(वेबटीम)
जिल्हा नियोजन समिती जनसुविधा योजनेअंतर्गत राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील दहा गावांना स्मशानभूमी विकास करण्यासाठी सुमारे 97 लाख 50 हजार रुपयांचा निधी खर्चास मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
अधिक माहिती देताना मंत्री तनपुरे यांनी सांगितले की,राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे 9 लाख 75 हजार डिग्रस येथे 9 लाख 75 हजार सात्रळ माळेवाडी येथे 9 लाख 75 हजार चिंचविहिरे येथे 9 लाख 75 हजार शिलेगाव येथे 9 लाख 75 हजार चंडकापूर येथे 9 लाख 75 हजार चेडगाव येथे 9 लाख 75 हजार तर पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे 9 लाख 75 हजार मिरी येथे 9 लाख 75 हजार तर नगर तालुक्यातील ससेवाडी येथे 9 लाख 75 हजार अशा एकूण दहा गावांमध्ये 97 लाख 50 हजार रुपये खर्च करून स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार आहे.
या निधी मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी सहकार्य केले गेल्या अनेक दिवसापासून स्मशानभूमीचा विकास करण्याची मागणी सातत्याने होत होती त्या मागणीचा विचार करून मंत्री तनपुरे यांनी प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे उर्वरित गावातील मंजुरीसाठी आलेले प्रस्ताव प्रतीक्षेत असल्याचेही सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत