राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- अत्यंत कमी कालावधीत नगर जिल्ह्यात अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टिस्टेटने बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञाना...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
अत्यंत कमी कालावधीत नगर जिल्ह्यात अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टिस्टेटने बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन एक नवा आदर्श निर्माण केला असून सामाजिक क्षेत्रातही संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचे मोठे योगदान असून ही संस्था अन्य संस्थासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेस पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली.प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी पोलीस अधीक्षक पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. संस्थेच्या सभागृहात साई आदर्श संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा सन्मान केला.प्रसंगी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या नेतृत्वामुळे साई आदर्श मल्टीस्टेटचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. संस्थेच्यावतीने फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुन्हेगारीला आळा बसावा या हेतूने नगर-मनमाड रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यांच्या या कार्यामुळे निश्चितच समाजात चांगुलपणा शिल्लक असल्याचे दिसून येते. संस्थेच्या नफ्यातील काही रक्कम समाजसेवेसाठी खर्ची करणारे शिवाजीराव कपाळे सारखे व्यक्तीमत्वांना भविष्य उज्जवल असल्याचेही मनोज पाटील म्हणाले. आभार चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी मानले.
यावेळी विष्णूपंत गीते, आबासाहेब वाळुंज, वेदांत कपाळे संस्थेचे मॅनेजर सचिन खडके सर्व कर्मचारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत