सात्रळ/वेबटीम:- सात्रळ तांभेरे रस्त्याचे मजबुतीकरण तसेच डांबरीकरण काम चालू असून नुकत्याच एक सायंदैनिकातून एका तथाकथित कार्यकर्त्यांकडून रस...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ तांभेरे रस्त्याचे मजबुतीकरण तसेच डांबरीकरण काम चालू असून नुकत्याच एक सायंदैनिकातून एका तथाकथित कार्यकर्त्यांकडून रस्त्याच्या कामासंदर्भात चुकीच्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकार झाल्याने विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांनी खुलासा दिला असून या रस्त्याच्या कामाच्या संदेर्भातील "दूध का दूध, पाणी का पाणी " केले आहे.
आपल्या खुलाशात विश्वासराव कडू यांनी म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या 28/9/2021, च्या व ज़िल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांच्या सहीनिशी प्रसिद्ध झालेल्या तसेच खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मागणी पत्र क्र. 1427 ता. 28/9/21चे मागणीनुसार ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजने अंतर्गत 30542141 नुसार, एजिमा 261 सात्रळ तांदुळनेर तांभेरे रोड रस्त्याचे मजबुतीकरण प्रस्ताव दाखल केला होता. सदर रस्त्यांची प्रस्तावित रक्कम रुपये एक कोटी होती.
सदर रस्ता मजबुती व डांबरीकरण प्रस्तावास ज़िल्हा नियोजन समितीच्या मंजुरीचे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे दि. 21/10/2021नुसार प्रशासकीय मान्यता पत्र दिले असून सदर पत्राचा जावक नं. जिनिस /0/2021/oct /AAO /02431 असून कामाचा सांकेतांक GP/2122/0623दि. 6/10/21नुसार होत आहे. सात्रळ तांभेरे रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण हे खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्याच निधीतून होत असून कोणीही कितीही विषपेरणी करणाचा प्रयत्न व जनतेची दिशाभूल करू नये असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत