उंबरे : वेबटीम। उंबरे सोसायटीच्या हितासाठी आणि युवा सभासदांच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीत उभे राहण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मंडळाच...
उंबरे : वेबटीम।
उंबरे सोसायटीच्या हितासाठी आणि युवा सभासदांच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीत उभे राहण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मंडळाच्या श्रेष्ठींनी मला संधी दिल्यास त्याचे नक्कीच सोने करेल, असा विश्वास शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित यांनी व्यक्त केला आहे.
पंडित म्हणाले, सोसायटी निवडणूक ही गावची अर्थव्यवस्थेला दिशा देणारी निवडणूक आहे, या संस्थेवर 2 हजार शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, ही संस्था उर्जितास्थेत आणण्याची गरज आहे. त्यासाठी गावातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या एकाच गटातील समविचारी व चांगल्या विचारांचे लोक एकत्र आले आहेत. यात साहेबराव दुशिंग, नवनाथ ढोकणे, सीताराम सर, कारभारी ढोकणे, संतोष ढोकणे, भाऊसाहेब दुशिंग, गंगाधर दादा, इंजि गोरक्षनाथ दुशिंग, नाना खंडू ढोकणे, गोरकदादा ढोकणे, विलासराव ढोकणे, कैलास अडसुरे हे लोक एकत्र आले आहेत, त्यामुळे मी देखील या पार्टीकडून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी पार्टीचे श्रेष्ठी आणि शिवसेना व छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अर्ज भरलेला आहे. नक्कीच मला श्रेष्ठी संधी देतील, सभासदांच्याही मी गाठी भेटी सुरू केल्या असून, आपल्याला मिळणारा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजप असे समविचारी गणराज मंडळ 12 जागा जिंकून सोसायटीवर आपला झेंडा फडकवेल, असा विश्वास पंडित यांनी व्यक्त केले. टीप : आपल्यालाही आपले राजकीय मनोगत, बातमी सशुल्क प्रसिद्ध करावयाची असल्यास संपर्क करा : 9665919933
कोणत्याही टिप्पण्या नाहीत