श्रीरामपूर मनसेच्या वतीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किराणा वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर मनसेच्या वतीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किराणा वाटप

श्रीरामपूर(वेबटीम) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेने श्रीरामपूरच्या वतीने...

श्रीरामपूर(वेबटीम)


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेने श्रीरामपूरच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.

 मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव संजय नवथर विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे तालुकाध्यक्ष बाबा रोकडे शहराध्यक्ष निलेश नाम बॉडी विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवशी यांच्या हस्ते नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले .



याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाले की आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून शिवजयंती निमित्त विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम व गोरगरीब लोकांना मदत करण्याचे उपक्रम राबवत असतो यावर्षी एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करण्यात आले  गेल्या पाच ते सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालू आहे की शासनाने एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनाकडे करून घ्यावे परंतु शासनाने यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेले आहे तरीदेखील शासनाने त्यांची दखल घेतली नाही उलट प्रामाणिकपणे नवरात्र सेवा देणाऱ्या कामगारांना कामावरून निलंबित केले त्यामुळे ह्या कामगारांचे आर्थिक परिस्थिती खालावली व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूर आतील 100 गरजवंत कुटुंबांना किराणा वाटप करून फुल ना फुलाची पाकळी ची मदत केली आहे.



 यापुढे नेवासा संगमनेर या तालुक्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किराणा वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत व त्यांना इतरी जी काही मदत लागेल ती मदत करण्याची प्रयत्न करणार आहोत जोपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ  झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विशाल शिरसाठ कामगार सेना तालुकाध्यक्ष किशोर वाडीले तालुका संघटक बबन माघाडे सरचिटणीस भास्कर सरोदे उपतालुका अध्यक्ष संतोष भालेराव दीपक लांडे शहर संघटक निलेश सोनवणे शहर सचिव दीपक सोनवणे शहर उपाध्यक्ष राजू शिंदे मनोज जाधव अरुण बोराडे विद्यार्थी सेना तालुका सचिव राम थोरात तालुका सरचिटणीस अतुल खरात विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष महेश कोलते सुमित गोसावी मंगेश जाधव शहर विभाग अध्यक्ष प्रसाद शिंदे ज्ञानेश्वर काळे संतोष आवटी मारुती शिंदे विजय शेळके महादेव होवळ विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष विकी शिंदे दादासाहेब बनकर ऋषिकेश खरात सोमनाथ कासार आकाश कापसे अनिल शिंदे गणेश रोकडे किशोर बनसोडे राहुल शिंदे बाबाजी शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत