राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील जय हिंद क्रिकेट क्लब व प्रशांत काळे मित्र परिवार आयोजित जयहिंद प्रीमियर लीग भव्य राज्यस्तरीय टेन...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील जय हिंद क्रिकेट क्लब व प्रशांत काळे मित्र परिवार आयोजित जयहिंद प्रीमियर लीग भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दिनांक २६ मार्च रोजी होणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील जयहिंद क्रिकेट क्लब मैदानावर २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान जयहिंद प्रीमियर लीग-२०२२ भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम बक्षीस ७१ हजार रुपये, ड्रीम युगा मोटारसायकल आणि आकर्षक ट्रॉपी देवळाली प्रवराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्याकडून दिले जाणार आहे. द्वितीय बक्षीस ५१ हजार रुपये, १ ग्रॅम सोन्याची अंगठी व आकर्षक ट्रॉपी जयहिंद क्रिकेट क्लब, राहुरी फॅक्टरी यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तृतीय बक्षिस ४१ हजार रुपये,एलईडी टीव्ही व आकर्षक ट्रॉपी जयश्री किराणाचे सर्वेसर्वा संदीप साठे व आदेश मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा सचिन जाधव यांच्यावतीने दिले जाणार आहे. चतुर्थ बक्षीस ३१ हजार, स्पोर्ट्स सायकल व आकर्षक ट्रॉपी आदित्य ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आढाव यांच्याकडून देणार आहे.
तरी या भव्य-दिव्य क्रिकेट स्पर्धेचा क्रिकेट प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन जय हिंद क्रिकेट क्लब व प्रशांत काळे मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत