राहुरी : वेबटीम उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत विश्वासघात करणाऱ्याना व उपसरपंच निवडीत घोडेबाजार करणाऱ्यांना सोसायटी निवडणुकीत जागा दाखवू...
राहुरी : वेबटीम
उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत विश्वासघात करणाऱ्याना व उपसरपंच निवडीत घोडेबाजार करणाऱ्यांना सोसायटी निवडणुकीत जागा दाखवून देणार, असा इशारा ग्रामपंचायत सदस्या सौ सारिका ढोकणे यांनी दिला आहे.
सारिका ढोकणे म्हणाल्या, सरांच्या जन्मभूमीला आपली कर्म भूमी मानून आपण शिकून सावरून स्थिर झाल्यावर गावाचे काही तरी देणं लागतो, या निर्मळ हेतूने दोन प्रस्थापित मोठ्या नेत्यांच्या विरोधात दुसरी आघाडी महिलांना बरोबर घेऊन उभी केली. गावाच्या इतिहासात आज पर्यंत कोणी ही दुसरी आघाडी उभी करून जिंकण्याची हिम्मत दाखवली नव्हती. परंतु ही हिम्मत आम्ही दाखवली. वरीष्ठ पातळीवरून खूप दबाव आला परंतु मी डगमगले नाही. गावाच्या विकासासाठी मागे नाही हटले. वेळप्रसंगी कुटुंब, नातेवाईक या पेक्षा गावाच्या विकासाला म्हणजेच पार्टी च्या बाजूने खंबीर उभे राहिले व पार्टीला बहुमत मिळवून दाखवले. भर उन्हात गावातील प्रत्येक घरी जाऊन भगिनींचे प्रश्न जाणून घेतले. व न भूतो न भविष्यती असा विजय प्राप्त करून (09 विरुद्ध 06) दाखवला.
परंतु सवयी प्रमाणे जुन्या नेत्यांनी स्वार्थासाठी आपले रंग दाखवायला सुरवात केली. पार्टी बरोबर राहून, पार्टी च्या पैशात गाडीत फिरून आमच्याच पार्टीच्या आमच्या जवळच्या सहकार्यांना म्हणजेच कैलास खंडागळे, बाबासाहेब ढोकणे, सोनाली शेजुळ, आशा पटारे यांना विरोधकांकडून पैसे घेऊन पराजित केले. ही गोष्ट विरोधक आज ही पुराव्यानिशी सांगतात. तसेच उपसरपंच निवडीच्यावेळी घोडेबाजार करून आम्हांला अंधारात ठेवून विश्वास घात केला.त्यावेळी विरोधकांकडून उपसरपंच पदाची ऑफर असतांना देखील पार्टीशी एकनिष्ठ राहिले. कारण राजकारण हा हेतू समोर ठेऊन नाही तर मी गावाच्या विकासासाठी गावात आले होते. परंतु राजकारणात नवीन असल्याने जुन्या नेत्यांचे राजकारण माहीत नव्हते. परंतु ते आता उत्तम प्रकारे समजले आहे. वाईट एकाच गोष्टींचे वाटते की गावकऱ्यांनी खुप मोठा विश्वास दाखवला होता आमच्या वर पण तो पूर्ण करता आला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत विश्वासघात करणाऱ्याना व उपसरपंच निवडीत घोडेबाजार करणाऱ्यांना सोसायटी निवडणुकीत जागा दाखवून देणार हे मात्र नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत