पत्रकार शिवाजी घाडगे सह देशातील ३६ मान्यवरांचा जलप्रहरी पुरस्काराने होणार दिल्लीत गौरव.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पत्रकार शिवाजी घाडगे सह देशातील ३६ मान्यवरांचा जलप्रहरी पुरस्काराने होणार दिल्लीत गौरव..

राहुरी(वेबटीम) देशातील पाणी समस्या दुर करण्यासाठी योगदान  तसेच जलसरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महनीय व्यक्ती 'जल प्रहरी...

राहुरी(वेबटीम)

देशातील पाणी समस्या दुर करण्यासाठी योगदान  तसेच जलसरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महनीय व्यक्ती 'जल प्रहरी' सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे.


केंद्रीय जल सरक्षण मंत्री गजेद्र सिंह शेखावत ,जलपुरुष राजेंद्र सिंह,यांच्या हस्ते देशातील जल प्रहरी सन्मान देऊन सन्मानित  करण्यात येणार आहे बुधवारी  ३० मार्च २०२२  रोजी नवी दिल्ली येथे हा  शानदार संमारभ केंदीय जलशक्ती मंत्रालयाच्या संयोगाने  आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कार्यक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय साठे यांनी दिली आहे .

महाराष्ट्र,हरियाणा,गुजरात,पंजाब,राजस्थान, आंध्रप्रदेश,तेलंगणा,अरुणाचलप्रदेश,आसाम,तामिळनाडू,हिमाचल प्रदेश,लडाख ,उत्तर प्रदेश,कर्नाटक,मध्यप्रदेश, दिल्ली अशा देशांतील  राज्यातील जल सरक्षण क्षेत्रात चांगले काम करण्याऱ्या संस्था व व्यक्ती यांचा सामावेश आहे .




नवनवीन उपयोग उपक्रम राबुन तसेच जलक्षेत्रात मार्गदर्शन करून आदर्श निर्माण  करणारे देशातील  शेतकरी,शास्त्रज्ञ,सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक, पत्रकार,अधिकारी यांना जल प्रहरी देऊन गौरवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील राहुरीचे पत्रकार शिवाजी घाडगे,मुंबई चे आय आर एस अधिकारी उज्वल चव्हाण,नांदेड चे दिपक मोरताळे,अंबेजोगाई लातूर चे अनिकेत लोहिया ,नवी दिल्ली चे पर्यावरण रक्षक दिवान सिंह व सुलभ इंटरनॅशनल चे बिद्रेश्वर पाठक ,हरियाणा  सोनीपत अभिमन्यू दाहिया,गुजरात भावनगरचे रमेश भाई पटेल,आंध्रप्रदेश विशाखापट्टणम बोलाशेट्टी सत्यनारायण, वारुणचे विजय देशमुख,बिहार छपारा मानव मनोहर,मोतिहारी डी एम श्रीशत कपिल अशोक (आईएएस) अरुणाचल इटानगर इगम बसार ,आसाम कोनझार डी सी बर्नान डेका (आईएएस ) पंजाब बरनाला रबदिप परवाही ,उत्तर प्रदेश ग्रेटर नोयाडाचे गौतम बुध्द , रामबीर तंवर,वाराणसी सजल श्रीवास्तव ,सुलतानपुर संदीप अहिरवार ,जम्मू काश्मिर देवधर चे समिर अंसारी ,हजारीबाग संजय कुमार सिंह,मध्यप्रदेश छिदवाडा नीरज कुमार सिंह,ग्वाल्हेर पंकज तिवारी,इंदोर प्रियांशु कुमठ,छत्तीसगड विरेद्र सिंह,तेलंगणा नारायनपेड जिल्हाधिकारी हरिचन्दन दासरी,राजस्थान बासवाडा जयेश जोशी, रजनीश शर्मा,कोटपुतळी विष्णू मित्तल,ब्रम्हाकुमारी माउंट आबु यशवंत पाटील,उत्तराखंड प्रकाश सिंह बिष्ट,त्रिपुरा अगर तळा विभूतिदेव वर्मा, आदी महनीय व्यक्ती याना जल प्रहरी ने सन्मानित करण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत