कोपरगाव/वेबटीम:- मागील अतिक्रमण काढून अकरा वर्षे झाले मात्र आजून त्याच विस्थापित टपरी धारकांचे पुनर्वसन झालेले नसताना दोन दिवसांपासून पुन्हा...
कोपरगाव/वेबटीम:-
मागील अतिक्रमण काढून अकरा वर्षे झाले मात्र आजून त्याच विस्थापित टपरी धारकांचे पुनर्वसन झालेले नसताना दोन दिवसांपासून पुन्हा नगर पालिकेने अतिक्रमण काढले असून नगर पालिकेने आता तरी विस्थापित टपरी धारकांसाठी हॉकर्स झोन ची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
कोपरगाव शहर स्वच्छ व सुंदर असावे ही फक्त प्रशासनाची नाही तर सर्व कोपरगाव कर नागरिकांची जबाबदारी आहे कोपरगाव शहरात 2011 साली अतिक्रमण काढले त्यात अनेक व्यावसायिक उध्वस्त झाले निवडणूक आली की या विस्थापित टपरी धारकांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले मात्र दहा वर्षात नगर पालिकेच्या सत्ताधारी लोकांनी या विस्थापित टपरी धारकांचे पुर्नवसन केले नाही
दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात अतिक्रम काढण्याची दुसरी लाट आली त्यात परत बरीच अतिक्रमने काढण्यात आले गेल्या दहा वर्षात वर्षात गोरगरीब जनतेची अतिक्रमण काढले पण कोपरगाव शहरातील विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या बऱ्याच नेत्यांनी अतिक्रमणे केली मात्र दुर्दैवाने गोरगरीब जनतेच्या पुर्नवसन करण्यावर कोणी ब्र शब्द काढला नाही
कोपरगाव शहरात आता पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रशासनाने काळजी घ्यावी मात्र मागील दहा वर्षात विस्थापित टपरी धारकांना जसे झुलवत ठेवले तसे न करता गोर गरीब व्यावसायिक व छोट्या छोट्या व्यवसायिक यांच्या साठी विशिष्ट असे हॉकर्स झोन उभे करावे व या व्यावसायिकांना जीवन जगण्याची संधी द्यावी असे या पत्रकात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत