राहुरीत रविवारी 'राहुरी गौरव पुरस्कार' प्रदान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत रविवारी 'राहुरी गौरव पुरस्कार' प्रदान सोहळा

  राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राहुरी व रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ राहुरी यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय...

 राहुरी(वेबटीम)


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राहुरी व रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ राहुरी यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना रविवार २७ मार्च रोजी  राहुरी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राहुरी तालुक्यातील   विद्यार्थी,  शिक्षक व नागरिक या राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर यश  मिळवले आहे अशा व्यक्तींना गौरविण्यात येणार असल्याची माहिती रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र अरगडे यांनी दिली.


रविवार २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथे सदर पुरस्काराचे वितरण  उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे, आमदार डॉ सुधीर तांबे,राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे,साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले  आदींच्या हस्ते होणार आहे.


तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र अरगडे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष शंकरराव गाडेकर,शिक्षक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस कल्याण राऊत, शिक्षक परिषदेचे नगरपालिका विभागाचे  जिल्हा कार्याध्यक्ष श्री अमोल लांबे आदींनी केले आहे.


*हे आहेत पुरस्काराचे मानकरी*


कु. तनिष्का अतुल तागड

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा कृषी विद्यापीठ राहुरी येथे पहिलीत  शिकणारी विद्यार्थीनी तनिष्का तागड हिने

दिल्ली येथे पार पडलेल्या 59व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले.त्याबद्दल तिचा गौरव करण्यात येणार आहे.


कु.विराज विवेकानंद खामकर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर या शाळेत  इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विराज विवेकानंद खामकर  याने वर्ड पॉवर चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्याबद्दल त्याचा गौरव करण्यात येणार आहे.


कु.सुदिक्षा दत्तात्रय कदम

इयत्ता सहावीत शिकणारी सुदिक्षा दत्तात्रय कदम हिने महाराष्ट्र शासन कृषी विभाग सहाय्यक कृषी अधिकारी परिवार आणि राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरावर आयोजित केलेल्या खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल तिचा गौरव केला जाणार आहे. 

सुदर्शन मंडलिक

बारागाव नांदूरचा युवक सुदर्शन चांगदेव मंडलिक याने  नेपाळ येथे पार पडलेल्या अंडर नाईन्टीन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्याचा गौरव केला जाणार आहे.

दिपक विलास काजळकर

बारागाव नांदूर येथील युवक दिपक विलास काजळकर  याने नेपाळ येथे आयोजित ओपन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात येणार आहे.

पत्रकार शिवाजी घाडगे

राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शिवाजी घाडगे यब केंद्र सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाल्याबद्दल व  राष्ट्रीय जलप्रहरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.


उपाध्यापिका मयुरा खिलारी

 धुळे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चार सुवर्ण पदक व एक रौप्य पदक पटकावणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरे खुर्द येथील उपाध्यापिका मयुरा विलासराव खिलारी यांचा गौरव करण्यात येणार आहे.


उपाध्यापक नारायण मंगलाराम

 सन २०२०चा राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार मिळवणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी शाळेचे उपाध्यापक नारायण चंद्रकांत मंगलारम यांचाही गौरव करण्यात येणार आहे.


उपक्रमशील शिक्षक अरुण तुपविहीरे

राज्यस्तरावर डॉक्टर सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षेचे यशस्वी आयोजन करून परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन करणारे व विद्यार्थ्यांसाठी इस्रो सहलीचा अभिनव उपक्रम राबवणारे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ येथील उपक्रमशील शिक्षक अरुण विष्णू तुपविहीरे सर यांचाही गौरव करण्यात येणार आहे.


उपाध्यापिका श्रीमती विद्याताई उदावंत

 अनेक शैक्षणिक पुस्तकांचे लेखन करणाऱ्या व ज्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघे वस्ती धानोरे येथील उपाध्यापिका श्रीमती विद्याताई उदावंत यांना राहुरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत